शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथे नाफेडची तूर खरेदी बंदच

By admin | Updated: March 30, 2017 00:08 IST

येथील बाजार समितीच्या यार्डात नाफेडतर्फे करण्यात येणारी तूर खरेदी गत १५ दिवसांपासून बंद आहे.

शेतकरी हवालदिल : गोदामांचा अभाव दिग्रस : येथील बाजार समितीच्या यार्डात नाफेडतर्फे करण्यात येणारी तूर खरेदी गत १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बाजार समितीच्या यार्डात व शेडबाहेर हजारो क्विंटल तूर उघड्यावर आहे. तूर विकली जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून नाफेड खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तूर खरेदी करीत आहे. दोन आवठड्यापूर्वी ढगाळ वातावरणाचे कारण पुढे करत तूर खरेदी बंद करण्यात आली होती. १५ मार्चपर्यंत १० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु त्यानंतर तूर खरेदी सुरूच झाली नाही. शेतकरी मोठ्या आशेन तूर घेऊन येथे येतात, परंतु तूर विकली जात नाही. येथील गोदामाची क्षमता संपल्याने आता अमरावती येथील गोदामात तुरी पाठवाव्या लागत आहे. परंतु वाहतुकीच्या खर्चासाठी आर्थिक तजवीज नसल्याने तूर खरेदी बंद असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सुरूवातील बारदाना नसल्याने तूर खरेदी बंद होती. परंतु दिग्रस येथे बारदान उपलब्ध असताना केवळ वाहतूक खर्चासाठी तूर खरेदी बंद आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी बी.एच. ढाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तूर वाहतुकीच्या खर्चासाठी ५० हजार रुपयांची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शविली. परंतु एवढ्या पैशात अमरावतीला तूर पाठविणे शक्य नाही. याबाबत खरेदी-विक्रीच्या संचालकांनी यवतमाळ येथे जाऊन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकरी आपली तूर बाजारात विक्रीसाठी नेत आहे. परंतु व्यापाऱ्यांचा भाव निश्चांकी आहे. तुरीची डाळ तेजीत असताना तूर मात्र कमी किमतीत विकावी लागत आहे. एकीकडे नाफेडची खरेदी बंद आणि दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून लूट अशा स्थितीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी आहे.