शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात कुत्र्याच्या भांडणातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:13 IST

Yawatmal news दोन शेजाऱ्याच्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले. या वादात शेजारी राहणाऱ्या युवकाचा चक्क विटा व दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबरच्या रात्री माळम्हसोला येथे घडली.

ठळक मुद्दे​​​​​​​माळम्हसोलाची घटनाग्रामीण पोलिसांनी केली आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : दोन शेजाऱ्याच्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले. या वादात शेजारी राहणाऱ्या युवकाचा चक्क विटा व दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबरच्या रात्री माळम्हसोला येथे घडली. यातील जखमी युवकाचा सावंगी मेघे येथील रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

माळम्हसोला गावात शेजारी राहणाऱ्या हागवणे व चव्हाण या दोन कुटुंबांनी कुत्रा पाळला आहे. १६ डिसेंबरच्या रात्री या दोन कुत्र्यात भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी रोहित रामचंद्र हागवणे (१८) याने शेजारी असलेल्या रमेश बबलूसिंग चव्हाण याला त्याचा कुत्रा घरात नेण्यास सांगितले. यातून रमेशने रोहितला शिवीगाळ केली. दोघांमध्ये शब्दावरून शब्द वाढत गेले. संतापलेल्या रमेशने रोहितला जवळच पडून असलेल्या विटेने मारहाण सुरू केली. रोहितला जमिनीवर पाडून अक्षरश: जीवघेणी मारहाण करण्यात आली. आरडाओरडा ऐकून गावकरी धावून आले. त्यांनी रमेशच्या तावडीतून रोहितची कशीबशी सुटका केली. गंभीर जखमी रमेशला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने डॉक्टरांनी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. सावंगी मेघे येथे रोहितचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबलूसिंग चव्हाण याने क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Murderखून