लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुंबईच्या दादरमधील एक दारू भट्टी थेट ७५९ किलोमीटरवरील यवतमाळ शहरात स्थलांतरित होत आहे. त्यामागे कारणही तसेच दिले. दादरमध्ये दारू विक्री कमी होते, त्या तुलनेत यवतमाळात जास्त होते असे सांगून या दारू भट्टी मालकाने यवतमाळवर लक्ष केंद्रीत केले आहे.सुभाष केशव सावंत आणि चंद्रकांत केशव सावंत यांची भागीदारीमध्ये मे. सुभाष देशी बार (सीएल-३ क्रमांक ९१) दादर मुंबई या नावाने देशी दारूची भट्टी आहे. ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी ११ मार्च २०२० रोजी यवतमाळच्या अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) यांच्याकडे रितसर अर्ज केला आहे. दादरमध्ये अपेक्षेनुसार देशी दारूची विक्री होत नाही. त्या तुलनेत यवतमाळमध्ये देशी दारूची विक्री अधिक प्रमाणात होत असल्याचे कारण या स्थलांतरणासाठी नमूद करण्यात आले आहे. मौजे वडगाव रोड येथील शेत सर्वे क्र. ३०/१ अ मधील प्लॉट क्र. ८ जाम रोड टच येथे कॉम्पलेक्समधील दुकान क्र. ३ मध्ये ही दारू भट्टी स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे.सावंत यांच्या अर्जाच्या अनुषंगाने यवतमाळच्या राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांनी हा अर्ज आपल्या यवतमाळ शहरातील अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी तसेच पोलिसांकडे अहवालासाठी पाठविला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर हा अर्ज राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई व तेथून या खात्याच्या मंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर या दारू भट्टीचे यवतमाळात नूतनीकरण केले जाऊ शकते.मुंबईतील ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यामागे राजकीय ‘इन्टरेस्ट’ असल्याचे सांगितले जाते. वास्तविक सावंत यांना ही भट्टी कोल्हापूरमध्ये स्थलांतरित करायची होती. मात्र यवतमाळात देशी दारू अधिक विकली जाते, असे सांगून त्यांचे कोल्हापूर ऐवजी यवतमाळात भट्टी स्थलांतरित करण्यासाठी मन वळविले गेले. यामागे मोठी आर्थिक ‘उलाढाल’ही झाल्याचे सांगितले जाते.वडगाव रोड भागात गुन्हेगारी आणखी वाढण्याची भीतीवडगाव, जाम रोड भागात आधीच गुन्हेगारी कारवाया अधिक आहेत. यापूर्वी त्या भागात खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. जाम रोडवर वसंत उद्यान आहे. त्या अनुषंगाने नागरिक मोठ्या संख्येने त्या भागात ‘मॉर्निंग वॉक’साठी जातात. मात्र आता जाम रोडवर थेट देशी दारूची भट्टीच स्थलांतरित होत असल्याने तेथील रहिवाशांना व ‘मॉर्निंग वॉक’साठी जाणाऱ्या महिला, नागरिकांना त्याचा त्रास होण्याची चिन्हे आहेत. या देशी दारूच्या भट्टीमुळे वडगाव, जाम रोड व परिसरात गुन्हेगारी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईची देशी दारूची भट्टी थेट यवतमाळात आणि जाम रोडवर स्थलांतरित करण्याची परवानगी राजकीय स्तरावरून दिली गेलीच कशी? असा प्रश्न त्या परिसरातील रहिवाशांमध्ये उपस्थित केला जात आहे.१६ कोटी लिटर दारू वर्षाकाठी रिचविली जातेयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दारू विक्री होते, या कारणावरून थेट मुंबईची दारू भट्टी शिप्ट केली जात आहे. त्यात खरोखरच तथ्य आहे का हे तपासण्यासाठी जिल्ह्यात वर्षभर होणाºया दारू विक्रीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील रेकॉर्डवर नजर टाकली असता धक्कादायक आकडे पुढे आले. एप्रिल ते मार्च या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १६ कोटी २२ लाख लिटर दारू मद्यपींकडून रिचविली जात असल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये १५ कोटी ६० लाख लिटर देशी दारू, ३७ लाख लिटर विदेशी दारू आणि २५ लाख लिटर बीअरचा समावेश आहे. यावरून मुंबईतून यवतमाळात येऊ इच्छिणाऱ्या दारू विक्रेत्याच्या दाव्यामध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट होते. त्यातही जिल्ह्यात देशी दारू पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.दादर मुंबई येथील दारू भट्टी यवतमाळात शिप्ट करण्याबाबतचा अर्ज प्राप्त झाला. या अनुषंगाने एक्साईज व पोलिसांमार्फत आवश्यक ती चौकशी केली जात आहे.- सुरेंद्र मनपियाएसपी, एक्साईज यवतमाळ.
मुंबईची दारू भट्टी होणार जाम रोडवर स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST
सुभाष केशव सावंत आणि चंद्रकांत केशव सावंत यांची भागीदारीमध्ये मे. सुभाष देशी बार (सीएल-३ क्रमांक ९१) दादर मुंबई या नावाने देशी दारूची भट्टी आहे. ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी ११ मार्च २०२० रोजी यवतमाळच्या अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) यांच्याकडे रितसर अर्ज केला आहे. दादरमध्ये अपेक्षेनुसार देशी दारूची विक्री होत नाही.
मुंबईची दारू भट्टी होणार जाम रोडवर स्थलांतरित
ठळक मुद्देराजकीय ‘इन्टरेस्ट’: म्हणे, यवतमाळात सर्वाधिक दारू विक्री