शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई दुग्ध उपायुक्तांच्या विदर्भातील बदलीला स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:40 IST

दुग्ध विकास विभागात भंडारा, गडचिरोली, अकोला येथे जागा रिक्त असल्याने मुंबईच्या महाव्यवस्थापकांना विदर्भात पाठविण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी ‘मॅट’मधून स्थगनादेश मिळविल्याने विदर्भातील रिक्त जागांचा प्रश्न कायम राहिला आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी‘मॅट’चा निर्णय आदेश मुख्य सचिवांना पाठविला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुग्ध विकास विभागात भंडारा, गडचिरोली, अकोला येथे जागा रिक्त असल्याने मुंबईच्या महाव्यवस्थापकांना विदर्भात पाठविण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी ‘मॅट’मधून स्थगनादेश मिळविल्याने विदर्भातील रिक्त जागांचा प्रश्न कायम राहिला आहे.गजानन नामदेव राऊत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील आरे मध्यवर्ती दुग्ध शाळेत महाव्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते. ते बदलीला पात्र होते. परंतु त्यांची बदली कायद्यानुसार एप्रिल-मे ऐवजी ऑगस्टमध्ये करण्यात आली. त्यांना भंडारा येथे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. शिवाय त्यांच्याकडे गडचिरोली व अकोल्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. आई-वडिलांचा आजार, निवासस्थानाची समस्या, मुलांचे शिक्षण आदी कारणे सांगून राऊत यांनी या मध्यावधी बदलीला अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. मुंबईमध्ये अनेक जागा रिक्त असताना थेट ९०० किलोमीटरवर भंडाºयात नियुक्ती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

म्हणे, मंत्री व मुख्यमंत्र्यांमुळे झाला विलंबबदली कायद्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाºयाची बदली एप्रिल-मेमध्येच करावी, त्यानंतर करायची असेल तर विशिष्ट कारण नमूद करावे या नियमांकडे अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांचे लक्ष वेधले. तेव्हा शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी ए.जे. चौगुले यांनी सांगितले की, राऊत यांच्या बदलीची प्रक्रिया मेमध्ये सुरू झाली. मात्र दुग्ध विकास मंत्री व मुख्यमंत्र्यांना स्वाक्षरी करण्यास वेळ न मिळाल्याने विलंब झाला. १७ ऑगस्टला स्वाक्षरी झाली व २० ऑगस्टला लगेच बदलीचे आदेश जारी केले. परंतू, ही बाब न्या. कुºहेकर यांनी नाकारली. प्रक्रिया व प्रत्यक्ष बदली दोन महिन्यातच होणे बंधनकारक असल्याचे सांगून राऊत यांच्या बदलीला ४ सप्टेंबर रोजी स्थगनादेश देण्यात आला. या प्रकरणात राऊत यांना अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

पशुसंवर्धनच्या बदल्याही वांद्यातराज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेवराव जानकर आहेत. या खात्याच्या यावर्षी झालेल्या बदल्यांबाबत ‘मॅट’ने नाराजी व्यक्त केली. पशुसंवर्धन विभागाच्या ३०० ते ४०० बदल्या झाल्या. त्यापैकी ७० ते ८० जणांनी ‘मॅट’च्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्याने या बदल्यांना स्थगनादेश मिळाला. राऊत यांची बदलीही अशाच पद्धतीने कायदा व नियमांना वाटाण्याच्या अक्षदा लावून केली गेल्याचा ठपका ‘मॅट’ने ठेवला.मंत्र्यांना सल्ला नाही किंवा सचिवांचा समन्वय नाहीदुग्ध व पशुसंवर्धन विभागातील ‘मॅट’च्या कचाट्यात अडकून स्थगनादेश मिळणाऱ्या बदल्या पाहता एकतर या विभागाच्या प्रधान सचिवांकडून मंत्र्यांना कायदेशीर सल्ला दिला गेला नसावा किंवा मंत्री व सचिव यांच्यात समन्वय नसावा असा ठपका ‘मॅट’ने ठेवला आहे. अशा प्रकारांमुळे कोर्टाकडील कामाचा व्याप वाढतो व त्याचा त्रास होतो, असेही ‘मॅट’ने नमूद केले. गजानन राऊत यांच्या प्रकरणात आदेशाची प्रत अवलोकन व योग्य कार्यवाहीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्याचे आदेश जारी केले गेले.

टॅग्स :Courtन्यायालय