शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

लोकसहभागातून काढणार निळोणा धरणातील गाळ

By admin | Updated: April 12, 2015 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते.

‘प्रयास’चा पुढाकार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवाहनयवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईचे मुख्य कारण म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात साचलेला गाळ होय. हा गाळ काढण्यासाठी आता प्रयास संस्थेने पुढाकार घेतला असून लोकसहभागातून धरणातील गाळ काढला जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी होणार असून यवतमाळकरांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रयास संस्थेच्यावतीने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाचे बांधकाम १९७२ साली पूर्ण झाले. या धरणाचे आयुर्मान ६० वर्षाचे असून आता ४३ वर्ष पूर्ण झाले आहे. या धरणात ३० ते ५० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणू नये यासाठी प्रयास संस्थेने धरणातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने २१ मार्चला गुढी पाडव्याला प्रकल्पस्थळी गुढी रोवून यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा या मोहिमेला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष लोकसहभागातून गाळ काढला जाणार असून उन्हाळ्यात ५० हजार ट्रॅक्टर गाळ काढण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या संस्थेने दोन लाख रुपयाचा निधी संकलित केला असून जलतज्ज्ञांकडून माहिती अवगत केली असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.धरणातील सुपिक गाळामुळे शेतजमिनीचे आरोग्य सुदृढ होऊन पिकाची उत्पादकता वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे या धरणातून निघालेला गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत आणि उपलब्ध प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात कार्यरत सामाजिक, व्यावसायिक उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील संघटनांची या अभियानासंदर्भात बैठक घेण्यात आली. ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, डॉ. आलोक गुप्ता, सुरेश राठी, डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगीनवार, डॉ. अनिल पटेल, कमल बागडी, अमोल साखरकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)शासनाचे सहकार्यया जलदायी अभियानासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ९ एप्रिल रोजी या प्रश्नावर संबंधित विभागाची बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही आपल्या अधिनस्त यंत्रणेची बैठक घेतली. कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी देखील या मोहिमेस महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत इंधन खर्च देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातून गाळ काढण्याची परवानगी दिली असून या विभागाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. वनविभागाकडून निळोणा मार्गावरील जलस्रोतावर बांध बंदिस्तींच्या कामाला मदत करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाची ग्रामीण भागातील यंत्रणा आणि यवतमाळ नगरपरिषद देखील या कार्याकरिता यांत्रिक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यवतमाळकरांना आवाहनया जल अभियानात यवतमाळकरांनी सहभागी होऊन कुठल्याही स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानासाठी येरावार चौकात माँ दुर्गा दवाबाजार येथे संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले असून यवतमाळकरांच्या कल्पना, सूचना कळवाव्या तसेच कुणाला याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.