शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिंदोडा प्रकल्पग्रस्त नदीपात्रात आंदोलन करणार

By admin | Updated: May 14, 2017 01:23 IST

जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विाकस महामंडळामार्फत प्रस्तावित दिंदोडा प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज

लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विाकस महामंडळामार्फत प्रस्तावित दिंदोडा प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज प्रकल्प संघर्ष समितीच्यावतीने काही मागण्यांसाठी नियोजित बॅरेज प्रकल्पस्थळी नदीपात्रात २० मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर सहकुटुंब या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तालुक्यातील सावंगी (संगम) येथे प्रस्तावित दिंदोडा बॅरेज महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळाने १९९७-९८ मध्ये यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वेणा नदी किनाऱ्यालगतच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवित सन १९९९-२००० मध्ये अधिग्रहीत जमिनींचा अल्पसा मोबदलासुद्धा दिला. नंतर प्रकल्प निर्मितीचा मूळ उद्देशही बदलविला गेला. पण प्रकल्पाच्या कामाला गेल्या २० वर्षांपासून अद्याप प्रारंभ झाला नाही. परिणामी सन १९९९ ते २००० मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या, परंतु शासनाने आजपर्यंत त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा ताबा घेतला नाही. त्या जमिनीवर आताही मूळ मालकाचाच ताबा व वहिती असून काहींना अद्याप जमिनीचा मोबदलासुद्धा देण्यात आला नाही. त्यामुळे नवीन भूमीअधिग्रहण कायदा २०१३-१४ कलम २४(२) नुसार ते अधिग्रहण रद्द करण्यात यावे, मागील १८ वर्षांपासून शासनाने संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा रेकॉर्डवर संपादीत जमिनीबाबतची नोंद व २०१६ साली घेतलेला फेरफार रद्द करण्यात यावा, प्रकल्पासाठी संपादीत केली जाणारी जमीन अत्यंत सुपीक असल्याने ती संपादीत करूच नये, अशा संघर्ष समितीच्या मागण्या आहेत. जनसुनावणीत शेतकऱ्यांनी प्रकल्पाला प्रखर विरोध केला. शासनाने या प्रश्नांकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे आता नदीच्या पात्रातच ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अभिजीत मांडेकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.