शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात होणार पाण्याच्या आणखी सोळा टाक्या

By admin | Updated: June 12, 2017 02:01 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पाण्याचा दाब वाढणार : ‘अमृत’मधून होणार पाणीपुरवठ्याची विविध कामेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई तर पाचवीलाच पुजली आहे. यात भरीस भर म्हणजे, कमी दाबाचा पाणीपुरवठा. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये १६ नवीन टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. ‘अमृत’ योजनेतून पाणीपुरवठ्याची विविध कामे हाती घेतली जाणार आहे. यवतमाळ शहराची मागील ४५ वर्षांपासून तहान भागविणारा निळोणा प्रकल्प आचक्या देवू लागला आहे. उन्हाळ्याचे चार महिने या प्रकल्पातून पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. गाळाने भरलेल्या या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. दोन-तीन पाण्यातच हा प्रकल्प ओव्हर फ्लो होतो. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता सोबतीला असलेला चापडोह प्रकल्पाचा आधार गेली काही वर्षांपासून घ्यावा लागत आहे. पुढील काही वर्षात निळोणा प्रकल्प ‘होता’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येवू शकते. गाळ काढण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ही शक्यता अधिक आहे. आता बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याची तयारी आहे. सोबतच शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणारा कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्नही निकाली काढला जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सहा ते बारा लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाक्या उभारल्या जाणार आहे. येत्या वर्षभरात किमान नऊ टाक्या पूर्ण क्षमतेने तयार होतील, असे सांगितले जात आहे. पुढील तीन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी दिली. यासाठीची आवश्यक ती प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.नवीन टाक्यांचे क्षेत्र व क्षमताचापडोह पुनर्वसन (सहा लाख लिटर), रूक्मिणीनगर (नऊ लाख लिटर), जिंद्राननगर (नऊ लाख लिटर), आरटीओ कार्यालयामागे (नऊ लाख लिटर), राजारामनगर (नऊ लाख लिटर), उमरसरा (नऊ लाख लिटर), बेले ले-आऊट (दहा लाख लिटर), वनवासी मारोती मंदिर परिसर (बारा लाख लिटर), सुयोगनगर दुसरी टाकी (चार लाख लिटर), शिवाजीनगर (चार लाख लिटर), वाघापूर टेकडी दुसरी टाकी (चार लाख लिटर), प्रिया रेसिडेन्सी परिसर (पाच लाख लिटर), विसावा कॉलनी (पाच लाख लिटर), चांदोरेनगर (दहा लाख लिटर), पॉलिटेक्नीक परिसर (दहा लाख लिटर), विठ्ठलवाडी (आठ लाख लिटर).