शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात कमी अन् टपरीवरच जास्त

By admin | Updated: September 1, 2016 02:33 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी अन् चहा

जिल्हा परिषद : सामान्य प्रशासन उदासीनयवतमाळ : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयात कमी अन् चहा टपरीवरच जादा दिसून येतात. बुधवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास तर चक्क सामान्य प्रशासन विभागाचे म्होरकेच चहाचे घोट रिचविण्यात मग्न होते.जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात सुमारे १५ हजारांच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर कोणत्याच कार्यालयांतर्गत एवढे कर्मचारी कार्यरत नाही. यात शिक्षकांसह शिक्षण आणि आरोग्य विभागात सर्वाधिक कर्मचारी आहेत. मात्र जिल्हा परिषद इमारतीमधील बहुतांश विभागातील कर्मचाऱ्यांना कामाची ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचे वास्तव आहे. याची प्रचिती जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार येते. हेच वास्तव बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या कामकाजानिमित्त दिल्लीला गेले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी ‘रिलॅक्स’ आहेत. याच संधीचा लाभ घेत बुधवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील ‘म्होरके’ आणि त्यांचे शिष्यवर्गीय कर्मचारी टपरीवर चहाचे घोट रिचविताना दिसत होते. हास्यकल्लोळात ते चहाचे घोट गळ्याखाली उतरवित होते. तिकडे त्यांच्या विभागात जिल्ह्यातील नागरिक चकरा मारत होते. साहेब नसल्याने ते मुकाटपणे परत जात होते. सामान्य प्रशासन विभागच उदासीन असल्याने इतर विभागांची अवस्थाही तशीच होती. (शहर प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे सतत प्रयत्न केले. सोमवार आणि शुक्रवारी सर्वांना एकाच गणवेशात येण्याचे आवाहन केले. परिणामी अधिकारी व कर्मचारी गणवेशात दिसूही लागले आहेत. मात्र कापडं बदलली तरी सर्वांची मानसिकता जुनीच आहे. काम पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. केवळ सोमवारी आणि शुक्रवारी एकाच गणवेशात सर्व दिसू लागले, एवढाच काय तो फरक दिसत आहे. शिस्त केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येत आहे.