शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व वादळाचा कहर

By admin | Updated: May 29, 2017 00:22 IST

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली,

आठ तालुक्यांना फटका : महावितरणला ४३ लाखांचा झटका लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील आठ तालुक्यात महावितरणचे तब्बल ४३ लाखांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. वणी, पांढरकवडा, दारव्हा, मारेगाव, झरी, नेर, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ आदी तालुक्याला पाऊस आणि वादळने झोडपून काढले. वणी, पांढरकवडा, नेर आणि दारव्हा तालुक्यातील सर्वाधिक गावांना या वादळाचा तडाखा बसला. नेर तालुक्यातील घुई, लिंगा, बोरगाव, मोझर, सोनखास, उत्तरवाढोणा, लासीना परिसरात १५ मिनीटांच्या वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे व वीज खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले. अनेक घरांचीही पडझड झाली. दारव्हा तालुक्यात कामठवाडा, चाणी, चिकनीत वादळाने कहर केला. दारव्हा-यवतमाळ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनेक वृक्ष उन्मळून पडले. हा मार्ग तब्बल १० तास बंद असल्याने वाहतूक ठप्प पडली. अनेक वीज खांब तुटून पडल्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. यवतमाळ तालुक्यातील तिवसा, वारज, हिवरी, इचोरीतही मोठे नुकसान झाले. हिवरीत दिलीप जोशी यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. बाभूळगाव, वणी व पांढरकवडा तालुक्यालाही वादळाचा मोठा फटका बसला. आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यांनी दारव्हा तालुक्यातील काही गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात ३६० खांब कोसळले वादळाने महावितरणलाही मोठा फटका बसला. कामठवाडा-चाणी येथे ४० खांब कोसळले. राळेगावमधील वडकी, झाडगाव परिसरात १६ खांब तुटले. रूई-वाई आणि हिवरीमध्ये १६ खांब तुटले आहे. वणी तालुक्यात नांदेपेरा परिसरात २५ खांब बाधीत झाल्याने परिसरातील १५ गावांचा वीज पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यात एकूण ३६० खांब कोसळले. उच्च दाब व लघुदाब वाहिनीचे खांब कोसळल्याने महावितरणला ४३ लाखांचा फटका बसला आहे. या वादळाने भुईमूगाचे मोठे नुकसान झाले.