शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रूपयांचे जनरेटर धूळ खात पडून

By admin | Updated: November 23, 2015 02:15 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून २० जनरेटर खरेदी करण्यात आले होते.

शिवानंद लोहिया हिवरीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून २० जनरेटर खरेदी करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत हे जनरेटर धूळ खात पडले असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. जिल्ह्यातील आश्रमशाळांसाठी २० जनरेटरची खरेदी दोन लाख ४५ हजार ९४७ रुपये प्रतिनग या दराने १९ मार्च २०११ रोजी मे.जी.एस. एन्टरप्रायजेस मुंबई यांच्याकडून खरेदी करण्यात आले होते. अमरावती अपर आयुक्त व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार ही खरेदी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील २० आश्रमशाळेत हे २० जनरेटर पोहोचविण्यात आले. परंतु आजमितीस पाच वर्षानंतरही ते सुरू करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना या जनरेटरचा कोणताही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शासनाने ६५ लाख ६६ हजार १२० रुपये पाण्यात गेल्याचेच सध्या तरी दिसून येते. यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांनाही पडला आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या विशेष निधीअंतर्गत ही खरेदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता व आदिवासी अपर आयुक्तांच्या आदेशानंतर प्रकल्प कार्यालयाने खरेदीची प्रक्रिया पार पाडली. आता ही खरेदी नियमबाह्य झाल्याने हा वाद न्यायालयात पोहोचल्याची माहिती आहे. या प्रकरणी सत्यता बाहेर येणे गरजेचे आहे. विद्यार्थी हिताच्या ज्या हेतूने हे जनरेटर खरेदी करण्यात आले तो हेतू अद्यापही साध्य झाला नाही. जनरेटर असेच पडून राहिल्यास अर्थातच त्यांची कार्यक्षमता कमी होईल. एकीकडे शासन आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देते, तर दुसरीकडे भ्रष्टाचारी लोकांमुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात बुडत आहेत. या बाबत सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाईची गरज आहे.