शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

राणे यांची मोहदा, पारवा येथे सभा

By admin | Updated: February 15, 2017 02:45 IST

शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजप

नागरिकांचा प्रतिसाद : केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप पांढरकवडा/पारवा : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी मोहदा व पारवा येथे मंगळवारी दुपारी जाहीर सभेत केला. काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांसाठी आयोजित सभेत राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोयाबीनला सात हजारांचा भाव मागणाऱ्या फडणविसांना आता कोणी रोखले ? सोयाबीनला आता का सात हजार रूपये भाव देत नाही? गरिबांसाठी काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची नाव बदलवून जनतेला तुम्ही किती दिवस फसविणार, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेचा हात धरून सत्ता मिळविणारे आता शिवसेनेला संपविण्याची भाषा करीत आहे. ही त्यांची दुटप्पी भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याची वेळ आली असून या संधीचा लाभ घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १२५ वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा येथे त्यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर सडकून टीका केली. या निर्णयामुळे गरीब, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेला प्रचंड हाल सहन करावे लागले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता ही जनताच त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके व जितेंद्रसिंग कोंघारेकर, बाबू धोपे, फारूक सिद्धीकी, रिजवान भाई व पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील पक्षाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)