शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

विवाहितेच्या आत्महत्येत पती व सासऱ्याला अटक

By admin | Updated: July 13, 2015 00:17 IST

सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याने माझ्या मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल केल्यानंतर पुसद शहर पोलिसांनी दीपाली सागर भालेकर...

हनुमान वॉर्डातील घटना : पैशासाठी छळ पुसद : सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याने माझ्या मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल केल्यानंतर पुसद शहर पोलिसांनी दीपाली सागर भालेकर आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. पती व सासऱ्यास अटक करण्यात आली आहे. येथील हनुमान वार्डातील दीपालीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला होता.दीपाली सागर भालेकर हिने १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. दीपालीचे आई-वडील पंढरपूर यात्रेला गेले असल्याने त्यांना उशिरा निरोप मिळाला. मुलीच्या आत्महत्येचा निरोप मिळताच त्यांनी पुसद गाठले. हदगाव तालुक्यातील कोळी येथील सतीश नामदेव मांढळे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्यात सासरच्या मंडळींनी पैशासाठी शारीरिक त्रास दिल्याने दीपालीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यावरून पुसद शहर पोलिसांनी पती सागर भालेकर, सासरा सुभाष भालेकर, ननंद रिना राजेश काळे, रिनाचा पती आणि दीर ऋषिकेश भालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी पती सागर व सासरा सुभाष यांना अटक केली आहे. गत काही दिवसात विवाहितेच्या छळांच्या घटनात वाढ झाली असून शारीरिक व मानसिक त्रासामुळे विवाहितांना टोकाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. (प्रतिनिधी)