शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

अनेकांनी उघडला पाणी विक्रीचा व्यवसाय

By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST

यावर्षी अतवृष्टी होऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भटकंती सुरू आहे

यवतमाळ : यावर्षी अतवृष्टी होऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भटकंती सुरू आहे तर दुसरीकडे पाण्याची विक्रीचा व्यवसाय तेजीत आला असल्याचे दिसून येते. विविध माध्यमांद्वारा ही विक्री सुरू आहे. नागरिकांच्या असहायतेचा लाभ उचलत अनेकांनी पाणी विक्रीच्या व्यवसायातून मोठय़ा प्रमाणात कमाई सुरू केली आहे. जीवन प्राधिकरणाकडून सात ते आठ दिवस नळ सोडल्या जात नाही. ज्या दिवशी नळ सोडण्यात येते त्या दिवशी अनेकांच्या घरापर्यंत पाणी पोहचण्याआधीच नळ जातात. तर अनेकांकडील नळाला फोर्स राहत नसल्यामुळे नळ जाईपर्यंंत त्यांना केवळ दोन ते तीन गुंडच पाणी मिळते. अशावेळी जिथे कुठे पाणी मिळत असेल, अशा ठिकाणाहून ते विकत घेण्यावाचून पर्याय उरत नाही. नागरिकांची हिच मजबुरी पाहता ज्यांच्याकडे पाणी आहे ते पाण्याच्या गुंडाप्रमाणे  विक्री करतात. अशावेळी वर्षभर्‍याचे कोणतेही संबंध, शेजारधर्म आता पाळल्या जात नसल्याचेच दिसून येते. शहरातील तलाव फैल, पिंपळगाव, बांगरनगर, अंबिकानगर आदी अनेक परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई असून नळाच्या दिवशी या   परिसरातील एक-दोन लोकांकडेच पाणी पोहोचते. इतरांकडे पाणी पोहचत नाही, अशावेळी ज्यांच्याकडे नळयोजनेच्या नळाचे पाणी पोहचते ते स्वत:कडील पाणी भरणे झाल्यावर परिसरातील इतरांना पाणी गुंडाप्रमाणे विकतात. १ रुपयांपासून पाच रुपये गुंडाप्रमाणे हे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागगते. परंतु कोणताही पर्याय नसल्याने नागरिक पाणी विकत घेतात. शहरातील बहुतांश बोअरवेल, विहिरी आटल्या आहेत. फारच कमी लोकांकडे विहिरींना व बोअरवेलला पाणी असते. त्यामुळे अशा लोकांकडूनसुद्धा पाणीटंचाईच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी विक्री करून पैसे कमविणे सुरू आहे. अनेकांकडे विवाह व इतर समारंभांची सध्या रेलचेल आहे. परंतु पाण्याअभावी मोठे संकट अशा ठिकाणी उभे ठाकते. अशावेळी          केवळ पाण्यासाठी विवाहाची          तारीख रद्द करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाण्याचे टँकरच बोलाविण्यात येते. पाण्याच्या टाकीच्या कमी-अधिक क्षमतेनुसार हे टँकर शहरात सध्या उपलब्ध आहे. तीनशे रुपयांपासून सात-आठशे रुपये यासाठी मोजावे लागतात. परंतु ज्यांच्याकडे विवाह समांरभासारखे कार्यक्रम आहे, त्यांना हे टँकर बोलवावेच लागत आहे. त्यातही पाणी साठवण करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. चार ते पाच हजार लिटर्स पाणी घरात साठवण करण्यासाठी पर्यायी     साधने नसतात. अशावेळी बिछायत केंद्रांमधून प्लास्टिकचे ड्रम भाड्याने आणावे लागते. या ड्रमचे भाडेसुद्धा सहन करावे लागते. अशा पद्धतीने सध्या टँकर मालकांचा व बिछायत केंद्र चालकांचाही व्यवसाय चांगलाच तेजित आहे. अनेक अँटोरिक्षा, सायकल रिक्षा व मालवाहू इतर छोट्या वाहनांमधून घरपोच अथवा कार्यक्रमस्थळी पाणी पोहचविले जाते. त्यामुळे इतर वेळी फारसी मिळकत नसलेल्या अशा वाहनचालकांना आता पाण्यामुळे चांगला रोज पडत असल्याचे दिसून आले. ज्यांना टँकर परवडत नाही आणि पाण्याची दुसरी कोणतीही सोय ज्यांच्याकडे नाही, असे नागरिक अँटोरिक्षा, सायकल रिक्षा व इतर छोट्या वाहनातून पाणी विक्री करणार्‍यांना प्राधान्य देतात. बिसलेरी, पाणीपाऊच व मोठय़ा कॅनद्वारा शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय तर सध्या अतिशय तेजीत आहे. या व्यवसायातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ग्रामीण भागात तर अशा व्यवसायातून  अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लूट सुरू असल्याचे दिसून येते. बिसलेरीच्या १५ ते १८ रुपये एमआरपी असलेल्या बॉटल्स २0 ते २५ रुपये घेऊन ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. कधी चिल्लर नसल्याचे कारण सांगितले जाते तर कधी कुलिंग चार्जच्या नावाखाली ग्राहकांना गंडविल्या जाते. गळा सुकलेला असताना आणि पाण्याची तीव्र गरज असलेला ग्राहक याकडे दुर्लक्ष करून दोन-चार रुपये कुठे नाही जात, असे म्हणून निघून जातात. परंतु प्रत्येक ग्राहकाकडून दोन ते दहा रुपयांची लूट करणारे अनेक व्यवसायी दररोज हजारो रुपये केवळ लुटीतून कमवितात. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ग्राहकसुद्धा तक्रार करण्याच्या मनस्थितीत नसतात. याचाच फायदा हे व्यावसायिक घेत असल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने एकीकडे पाणीटंचाईने कळस गाठला असताना दुसरीकडे मात्र या टंचाईतही लोकांची लूट करून पाणी विक्रीचा व्यवसाय थाटून आपले उखळ पांढरे करून घेणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. कोणतीही माणुसकी न जपता स्वत:च्या स्वार्थासाठी अनधिकृतपणे पाणी विक्री करणार्‍यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. याचाच फायदा घेऊन अनेकांनी आपले खिसे भरणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)