शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

मांगली, हिरापूर वाघाच्या दहशतीत

By admin | Updated: June 11, 2017 00:32 IST

शुक्रवारी सकाळी व सायंकाळी एकापाठोपाठ माणसांवर हल्ले करणाऱ्या वाघाची पंचक्रोशीत दहशत तयार झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : शुक्रवारी सकाळी व सायंकाळी एकापाठोपाठ माणसांवर हल्ले करणाऱ्या वाघाची पंचक्रोशीत दहशत तयार झाली आहे. शनिवारी वन विभाग व पोलिसांच्यावतीने हिरापूर व मांगलीसह परिसरातील गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर वाघाने शनिवारी सकाळी हिरापूर शिवारात एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची चर्चा परिसरात होती. मात्र या घटनेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सध्या या परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत लागला आहे. अशातच शनिवारी मांगली व हिरापूर येथे वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हल्लेखोर वाघ अद्यापही याच भागात वावरत असल्याचे सांगण्यात येते. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर नागरिक घराबाहेर निघण्याचेही टाळत आहेत. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलिसांच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या वाघाचा वावर याच परिसरात असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी सध्या शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वाघाला जंगलाकडे पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.