शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा अभियंत्याची खुर्ची जप्त

By admin | Updated: February 28, 2017 01:21 IST

संपादित जमिनीचा मोबदल्यासाठी रामनगरच्या शेतकऱ्याने जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीसह तीन संगणक, फाईल जप्त केली.

संगणक, फाईलही सील : जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायालयाचा आदेश यवतमाळ : संपादित जमिनीचा मोबदल्यासाठी रामनगरच्या शेतकऱ्याने जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीसह तीन संगणक, फाईल जप्त केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. १९९४ मध्ये चापडोह प्रकल्पाकरिता रामनगर यावली येथील छगन लक्ष्मण राठोड या शेतकऱ्याची पाच हेक्टर २१ आर जमीन संपादित करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्याला वाढीव मोबदला १३ लाख रूपयांचा वाढीव मोबदला मिळाला नाही. आता त्याची रक्कम २९ लाख ८४ हजार रूपयांच्या वर गेली आहे. यामुळे शेतकऱ्याने जप्तीच्या कारवाईकरिता न्यायालयाला परवानगी मागितली. दिवाणी न्यायाधीश खडसे यांनी या संदर्भात जप्ती वॉरंट काढला. राठोड यांनी न्यायालयाचे बेलीफ ए.पी. निकम, बुध्दीराज काटपेलवार आणि जाधव यांच्या मदतीने जप्तीची कारवाई केली.यावेळी कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांनी दाखल झालेल्या शेतकऱ्याला मुदत मागितली. त्यांनी वाढीव मुदत देण्यास नकार दिला. जप्त झालेले साहित्य न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. हे साहित्य ६० दिवसात न सोडविल्यास त्याचा लिलाव होणार आहे. यानंतरही शेतकऱ्याला मोबदला न मिळाल्यास संबंधितांना कारागृहात का पाठवण्यात येवू नये म्हणून नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी छगन राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)चौथ्यांदा नामुष्कीराठोड यांनी मोबदला मिळावा म्हणून गत सात वर्षांपासून पाठपुरावा केला केला आहे. सात वर्षात चार वेळा जप्ती वॉरंट बजावला. प्रत्येकवेळी मुदत वाढवून मागण्यात आली. तर काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्तीची कारवाई झाली. मात्र मोबदला अजुनही मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले.पूर्वी हे प्रकरण जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांकडे होते. अचानक आमच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई झाली आहे. मोबदल्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली. अजूनही मोबदला मिळाला नाही. पैसा येताच पैसा देणार आहे.- दिनेश बोरकर, कार्यकारी अभिंयंता जीवन प्राधिकरण.