शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्याचा मामेभाऊच दरोड्याचा मुख्य सूत्रधार

By admin | Updated: August 26, 2014 00:15 IST

पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

तिघांना अटक : पाच लाखांच्या दरोड्याचे प्रकरणपांढरकवडा : पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सूत्रधाराला आणि त्याच्या दोन साथिदारांना पोलिसांनी विविध ठिकाणावरून अटक केली. सारंग भोयर रा. पिंपळखुटी ता. कळंब असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तर रामचंद्र मडावी रा. पिंपळखुटी आणि भारत तोडासे रा. जोडमोहा अशी अटक केलेल्या त्याच्या दोन साथिदारांची नावे आहेत. यापूर्वी याच घटनेत प्रवीण राऊत रा. चाणी व दिगंबर उर्फ सनी राठोड रा. जोडमोहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. १९ आॅगस्टला चेकपोस्टवरील पाच लाख रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी घेऊन येत असलेला चेकमेट कंपनीचा नोकर प्रवीण राऊत याला मारहाण करून ती रोकड पाच ते सहा जणांनी लूटून नेली. घटनेनंतर जखमी अवस्थेत प्रवीणने पांढरकवडा पोलीस ठाणे गाठले.यावेळी त्याने सांगितलेल्या घटनाक्रमात प्रचंड तफावत होती. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्यालाच अटक केली. त्यानंतर गोपनीय माहितीवरून सनी राठोड याला अटक केली. कोठडी दरम्यान सनीने या घटनेत भारत तोडासे याने सामिल करून घेतल्याची कबुली दिली. तेव्हापासून पोलीस भारत तोडासे याच्या मागावर होते. तो यवतमाळ येथील भाजी मंडईत काम करीत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून त्यांनी मंडईत जाऊन शोध घेतला. मात्र भारत पसार झाला होता. त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्याच्या मोबाईलवरून सतत सारंग भोयर याच्या नावे असलेल्या मोबाईलवर कॉल केले जात असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी या दोघांना त्यांच्या राहत्या घरुन शिताफीने अटक केली. अटके दरम्यान दोघांनीही पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. भारत तोडासे याच्या घरझडतीत पोलिसांनी ६० हजारांची रोकड जप्त केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, फौजदार संजीव खंदारे, राजकिरण मडावी, जमादार दुर्गालाल टेंभरे, विजय वानखडे आदींनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)