शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसमोरच प्रियकराने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 14:45 IST

Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देभिसनी जंगलातील थरारप्रेयसीच्या कबुलीवरून रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. नेहमीप्रमाणे हे युगुल २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या ठराविक जागेवर गेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा घटनाक्रम प्रेयसीने ग्रामीण पोलिसांपुढे कबूल केल्याने खुनाच्या संशयाच्या मळभट दूर झाले. शब्बीर जुम्मा लालनवाले (३८) रा. जामडोह असे मृत प्रियकराचे नाव आहे. त्याचे गावातील ३५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या अनैतिक संबंधाचे बिंग फुटले. शब्बीरच्या कुटुंबीयांना ते माहीत झाल्याने त्याला समजावून सांगितले जात होते. शब्बीर दुचाकीने २१ डिसेंबरच्या दुपारी प्रेयसीला घेऊन  भिसनी जंगलातील एका दरीत उतरला. त्यांचे ते नेहमीचे ठिकाण होते. शब्बीर दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा मंगळवारी शब्बीरची दुचाकी भिसनी जंगलात आढळली. काही अंतरावर दरीमध्ये त्याचे प्रेत दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रेमसंबंधाचा प्रकार असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. सुरुवातीला खुनाचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र शब्बीरची प्रेयसी पोलिसांच्या हाती लागताच तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. शब्बीरने मद्यप्राशन केले, नंतर त्याच दारूची बॉटल फोडून काचाने डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही. त्याने प्रेयसीच्या गळ्यातील ओढणी घेवून झाडाला गळफास लावला. त्याच्या प्रेयसीने त्याचा गळफास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ते शक्य झाले नाही. शेवटी तिने काचाने ओढणी चिरली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शब्बीरचा मृत्यू झाल्याचे पाहून तिनेही त्याच्या कंबरेचा पट्टा तोडून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला गळफास लागला नाही. घाबरलेल्या अवस्थेत ती पळून गेली, असा जबाब ग्रामीण पोलिसांनी नोंदविला आहे. शिवाय शवविच्छेदन अहवालानुसार शब्बीरचा मृत्यू हा गळफास लागल्याने झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या हातावरील जखमा या स्वत:च केल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याच आधारावर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे, अशी माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्या