शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून खो

By admin | Updated: December 16, 2015 02:50 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्याचे आदेश आहेत.

आदेशाची पायमल्ली : हागणदारीमुक्तीबाबत अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची कमी, घनकचरा गोळा करण्याला अद्याप सुरूवात नाहीयवतमाळ : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्याचे आदेश आहेत. परंतु या अभियानाची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे यवतमाळ जिल्ह्यातील एकंदरित परिस्थितीवरून दिसून येते. शहरे हागणदारीमुक्त करणे व २ आॅक्टोबर २०१८ पर्यंत शहरातील घनकचरा शंभर टक्के गोळा करणे, त्याची वाहतूक करणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील नगर परिषदांद्वारा हे अभियान ज्या संथगतीने राबविण्यात येत आहे ते पाहता २ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त आणि २ आॅक्टोबर २०१८ पर्यंत शहरातील घनकचरा शंभर टक्के गोळा करण्याचे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य होईल, असे वाटत नाही. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या इच्छाशक्तीची कमी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला राज्य शासनाकडून आपल्या शहरात स्वच्छता, हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयांवर अभियान राबविण्यात येत आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. जर सर्वसामान्य नागरिकांना माहितीच नाही, तर नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे अभियान वेळेत पूर्णत्वास जाईल, याबाबत शंकेला मोठा वाव आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ज्या कुटुंबाकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जातात अशा कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सामूदायीक शौचालय उपलब्ध करून द्यावयाची आहेत. याबाबत गठीत करण्यात आलेली समितीने तपासणी करावयाच्या शहरास किमान दोन दिवस भेट देऊन शहराची पाहणी करणे अपेक्षित आहे. यामध्ये शहरातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही, याची पाहणी महत्वाची आहे. शहरातील तरंगती लोकसंख्या लक्षात घेता शहरात आवश्यक अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालये पुरेशा प्रमाणात आहे का तसेच त्याचा वापर होतो का, याची पाहणी ही समिती करणार आहे. उल्लेखनिय म्हणजे या समितीने शहरातील अशा भागाला पहाटेच्या आणि रात्रीच्या सुमारास भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समिती आपला अहवाल सबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे तर राज्यस्तरीय समितीने आपला अहवाल नगर विकास विभागाला सादर करणे आवश्यक आहे. शहर हागंदारीमुक्त घोषीत करणे व त्याची तपासणी करण्याबाबत काही टप्पे निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार शहर हागंदारीमुक्त झाल्याची स्वयंघोषणा करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्राथमिक तपासणी आणि राज्य शासनामार्फत तपासणीख केंद्र शासनामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र स्वच्छता अभियानाबाबत नगर परिषदांमध्ये कोणताही उत्साह दिसून येत नाही. या अभियानाची जी संथगतीने सुरूवात जिल्ह्यात सुरू आहे, ती आश्चर्यजनकच आहे. (प्रतिनिधी)