शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

By admin | Updated: May 18, 2016 02:44 IST

एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत.

प्रशासन निद्रिस्त : दुष्काळाचा उपयोग स्वत:चा गल्ला भरण्यासाठीयवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत. परंतु काही महाभाग याही परिस्थितीचा फायदा स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. अत्यल्प पाऊस आणि त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनाचा अभाव यामुळे यवतमाळ शहरात आज तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या खासगी विहिरींना पाणी आहे, ते मात्र अव्वाच्या सव्वा दरात पाणी विक्री करीत आहेत. यवतमाळ शहरात जीवन प्राधिकरणाकडून सध्या चार दिवसाआड, काही भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. काही भागात तर तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत नगर परिषदेकडून टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत: खासगी टँकरद्वारा पाणी विकत घेतात तर काही ठिकाणी दोनचार नागरिक मिळून टँकर बोलावून पाणी वाटून घेतात. अनेकांकडे काही प्रसंगारुप पाण्याची अधिक गरज असल्यास टँकर शिवाय पर्याय नसतो. याचाच फायदा घेऊन ज्यांच्या विहिरींना अथवा बोअरवेलला पाणी आहे, असे महाभाग अव्वाच्या सव्वा दराने पाणी विकत आहेत. केवळ दोन हजार लिटर्स पाण्याचे तीनशे ते चारशे रुपये तर तीन हजार लिटर्सच्या टँकरचे पाचशे ते आठशे रुपये घेणे सुरू आहे. कोणत्याही पावतीशिवाय मनमानी करून ही पाणीविक्री सुरू आहे. अनेकजण पिण्याचे पाणी बोअर किंवा विहिरीचे फिल्टर न करताच कॅनमध्ये भरून ३० ते ५० रुपयांपर्यंत या कॅनची विक्री करीत आहेत. या पाण्याच्या शुद्धतेची कोणतीही खात्री नाही. याकडे नगर परिषद व अन्न औषधी प्रशासन सारख्या सबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविले असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याबाबत नगर परिषदेशी संपर्क साधल्यास खासगी पाणी विक्रेत्यांनी ते जास्तीत जास्त किती रुपयांना विकावे, याचे निकष आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त दराने कुणी विक्री करीत असल्यास लेखी तक्रार करा त्यानंतरच आम्ही कारवाई करू असे सांगण्यात आले. तक्रार करून या टँकर माफियांशी दुश्मनी गोरगरीब लोक कसे घेतील, हे मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. पाण्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही, असे म्हटले जाते. पूर्वी दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीत ज्यांच्या विहिरींना पाणी असायचे, असे नागरिक स्वत:ची विहिर इतरांसाठी खुली करून देत होते, आज मात्र या पाण्याच्या पैशातून आपल्या सात पिढ्या कशा जगतील, याची तजवीज लावली जात आहे. (प्रतिनिधी)