शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी साहित्य विक्रेत्यांकडून महागावात शेतकर्‍यांची लूट

By admin | Updated: June 2, 2014 01:50 IST

महागाव तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट

महागाव : महागाव तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट होत असून कृषी अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जादा दराने लिकिंग करून खत व बियाण्यांची विक्री होत आहे.

मृगनक्षत्र अगदी तोंडावर आले आहे. शेतकरी मशागतीत व्यस्त असून कृषी केंद्रांमध्ये जाऊन खते व बि-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन त्यांची लूट करण्याचा सपाटा महागाव तालुक्यात चालविला आहे. तालुक्यात ६0 हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असून ३२ हजार शेतकरी आहे. कपाशीच्या पेरणीसाठी दोन लाख बीटी बियाणे पॅकेटस्ची आवश्यकता असून १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. तालुक्यात असलेल्या ७३ कृषी केंद्रात मोठय़ा प्रमाणात खते व बि-बियाणे आणण्यात आले आहे. मात्र या कृषी केंद्र चालकांनी अधिकार्‍यांना हाताशी धरुन चढय़ा भावाने विक्री चालविली आहे.

कृषी केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकार्‍यांचे आहे. दरमहा कृषी केंद्राला भेट देऊन त्याचा अहवाल पाठविणे गरजेचे आहे. परंतु कोणताही अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अधिकारी व कृषी केंद्र चालकांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. एखाद्या कृषी केंद्र चालकाची तक्रार करायची असल्यास अधिकारी कार्यालयात भेटत नाही. मोबाईलवर संपर्क साधायचा तर नॉट रिचेबल असतात. या सर्व प्रकारात शेतकरी अक्षरश: लुटला जात आहे. अनेक कृषी केंद्र चालकांनी गावागावांत अनधिकृत गोदाम तयार केले आहे. या ठिकाणी माल साठविला आहे.

कृषी केंद्र चालकांना साठा फलक लावणे आवश्यक आहे. तसेच स्टॉक बुक अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. परंतु कोणत्याही कृषी केंद्रात साठा फलक दिसत नाही. उलट बियाणे आणि खते लिंकिंग करून जादा दराने विकले जात आहे. बियाण्यांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता कृषी केंद्र चालकांनी अवैध साठा केला असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांची लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)