शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उसाला अधिक भाव कोण देतो याकडे नजरा

By admin | Updated: September 2, 2016 02:31 IST

गेले कित्येक दिवस बंद असलेला गुंज येथील साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी आणि मराठवाड्यातील साखर कारखानेही

कारखान्यांचा गाळप हंगाम : गुंजच्या कारखान्यातील जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर महागाव : गेले कित्येक दिवस बंद असलेला गुंज येथील साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी आणि मराठवाड्यातील साखर कारखानेही महागावातून ऊस उचलण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत उसाला अधिक कोण भाव देतो, याकडे महागाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच गुंज कारखान्यातील जुन्या कामगारांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना अवसायनात आला. त्यानंतर हा कारखाना राज्य बँकेने लिलावात काढला. नॅचरल शुगरने ५४ कोटी रुपयात हा कारखाना विकत घेतला. कारखान्यातील यंत्र सामुग्रीची डागडुजी सुरू असून लवकरच साखर कारखाना सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी येथील साखर कारखानाही सुरू होईल. तसेच मराठवाड्यातील साखर कारखान्यांचीही महागावातील ऊसावर नजर असते. अशा स्थितीत उसाला कोण अधिक भाव देणार याकडे महागाव तालुक्यातील उस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. नॅचरल शुगरने अधिक भाव दिल्यास शेतकऱ्यांना सोईचे जाणार आहे. परंतु हा व्यापारी तत्वावरील साखर कारखाना शेतकऱ्यांना काय देतो याबद्दल शेतकरी साशंक आहे. सहकारी तत्वावरील पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत आहे. गतवर्षी अत्यल्प गाळप करून हा कारखाना बंद पडला होता. त्यामुळे यंदा तो कधी सुरू होणार आणि किती गाळप करणार यासोबतच काय भाव देणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच मराठवाड्यातील साखर कारखाने महागावातील उसाला काय भाव देतात हेही महत्वाचे आहे. समाधानकारक भाव मिळाल्यास शेतकरी जवळच्या कारखान्याला ऊस देऊ शकतात. दुसरीकडे नॅचरल शुगर साखर कारखाना सुरू होण्यापूर्वीच कामगारांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांची बुधवारी कारखाना साईडवर बैठक झाली. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. याबाबत कार्यकारी संचालकांना विचारणा केली असता कामगारांंना पगारापोटी दीड कोटी थकीत देणे असून ती अवसायकांना देणे असण्याची माहिती जी.व्ही. गांगणे यांनी दिली. या कारखान्यावर १०० कोटीच्यावर कर्ज आहे. जे काही देणे आहे ते आम्ही लावून घेतले आहे. त्यापैकी कामगारांचे देणे आहे, परंतु आम्हाला थेट कामगारांना पैसे न देता अवसायकांना द्यावे लागेल. एकंदरित नॅचरल साखर कारखाना सुरू होण्यापूर्वीच कामगारांचा वाद ऐरणीवर आला आहे. आता नॅचरल शुगर यातून कसा मार्ग काढते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)