शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

‘मेडिकल’मध्ये लिव्हर, किडणी चाचणी बंद

By admin | Updated: February 22, 2017 01:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून लिव्हर आणि किडणी फंक्शनिंगची चाचणी करणारी मशीन बंद आहे.

प्रशासनाची हेकेखोरी : डझनावर स्मरणपत्र देऊनही अद्याप दुरूस्ती नाही यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून लिव्हर आणि किडणी फंक्शनिंगची चाचणी करणारी मशीन बंद आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाला डझनावर स्मरणपत्र देऊनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही. जिल्ह्यत सर्पदंश आणि विष प्राशनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात येतात. अशा रूग्णांच्या या दोन्ही चाचण्या करणे अत्यावश्यक असते. गंभीर रूग्णांवरील उपचाराची दिशा, लिव्हर आणि किडणी तपासणीच्या अहवालावरूनच केली जाते. मेडिकलमध्ये दिवसाकाठी या तपासणीचे विविध विभागातून जवळपास एक ते दीड हजार रक्त नमुने येतात. मात्र प्रशासनाची दफ्तर दिरंगाई व हेकेखोर वृत्तीमुळे या मशिनची दुरूस्ती रखडली आहे. लाखो रूपये किमतीच्या या मशिनला बॅकप देण्यासाठी आॅनलाईन युपीएस नसल्याने ही मशीन वारंवार बंद पडत आहे. केवळ काही हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या खरेदीसाठी प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद पडलेली मशीन सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात पुन्हा बंद पडली. याबाबत प्रशासन गंभीर नाही. उलट खरेदी प्रक्रियेत शंकाकुशंका उपस्थित करून गरीब रूग्णांचा येथे एकप्रकारे छळ केला जात आहे. बायोकेमेस्ट्री विभागात मशीनच्या कक्षातील वातानुकूलित यंत्रही बंद आहे. तेथील तापमान नियंत्रणात नसल्याने मशिनवर विपरित परिणाम होतो. ‘आॅटोमोटेड अ‍ॅनालायझर’ मशीन पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. रूग्णालयात वातानुकूलित यंत्रणेचे तंत्रज्ञ उपलब्ध आहे. मात्र त्यांना एसी दुरूस्तीचे निर्देश नाही. सहज शक्य असलेल्या कामातही काही ना काही चुका काढून मशीन बंद कशा राहतील, याचीच व्यवस्था केली जाते. अवघ्या १६ हजार रूपये किंमतीच्या लॅम्प खरेदीसाठी शेकडो आक्षेप घेण्यात आले. त्यानंतरही ही खरेदी झालीच नाही. या कामाकाजाचा फटका ग्रामीण भागातून आलेल्या गरीब रूग्णांना सहन करावा लागत आहे. तेथे जादा शुल्क आकारले जाते. बरेचदा आर्थिक क्षमता नसल्याने डॉक्टरांनी सुचविल्यानंतरही या तपासण्या केवळ पैशाअभावी केल्या जात नाही. मात्र त्याच्याशी मेडिकल प्रशासनाला कोणतचे सोयरसुतक दिसत नाही. दोन दिवसांपासून सोनोग्राफी मशीन बंद आहे. गर्भवती महिलांना दोन-दोन महिन्याचे वेटींग दिले जाते. सोनोग्राफी तपासणीपूर्वीच प्रसूती होते. या गंभीर बाबीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. अनेक विभागात असलेल्या मशीनरींची अशीच अवस्था आहे. समस्या घेऊन आलेल्यांचे येथे कधी समाधान केले जात नाही. उलट त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होतो. (कार्यालय प्रतिनिधी) पुरवठादाराच्या सल्ल्याने कामकाज ‘मेडिकल’ प्रशासनाचा कारभार हा एका इंजिनिअरींग फेब्रिकेटर्स पुरवठादाराच्या मर्जीने सुरू असल्याचे सांगण्यात येते. हा पुरवठादार पूर्णवेळ कक्षात ठाण मांडून बसतो. साधी टाचणी खरेदीचा निर्णयसुद्धा त्याच्याच सल्ल्याने घेतला जातो. ‘मेडिकल’ प्रशासनाची मर्जी राखण्यात तरबेज असलेल्या या पुरवठादाराची सध्या चांगलीच चलती आहे. प्रशासनही या पुरवठादाराची ढवळाढवळ खपवून घेत असल्याने अनेक विभाग प्रमुखांमध्ये नाराजी आहे. ‘नॉनकरप्ट’ असल्याचा कांगावा करणाऱ्या ‘मेडिकल’ प्रशासनाला त्या पुरवठादाराची मध्यस्थी कशाला हवी, असा प्रश्न सध्या मेडिकल वर्तुळात चर्चिला जात आहे.