शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी एलसीबीचे प्रमुख वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:26 IST

पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अ‍ॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देमारोती सुरपाम मृत्युप्रकरण : मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याने तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अ‍ॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी या प्रकरणी सर्वतोपरी चौकशी केली जाईल, जो दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन मृताच्या नातलगांना दिल्यानंतर मारोती सुरपामचे पार्थिव रात्री उशिरा त्याच्या गावी नेण्यात आले.दरम्यान, गुरूवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एलसीबी प्रमुख प्रदीप सिरस्कर हे वणीत दाखल झाले. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीदेखील करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मारोती सुरपाम हा वणी पोलीस ठाण्यात गेला होता. तो मुळचा कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याचे सासर वणी आहे. कौटुंबिक वादासंदर्भातील तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्याची तक्रार न स्विकारता त्याला डी.बी.रुममध्ये बसवून ठेवले, असा नातलगांचा आरोप आहे. या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण झाल्याने मारोती निराश झाला व त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केले, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.पोलिसांनी मात्र हा आरोप नाकारला आहे. मारोती जेव्हा पोलीस ठाण्यात आला, तेव्हा त्याची मनस्थिती ठिक दिसत नव्हती. त्याचे वर्तन मनोरुग्णासारखे वाटल्याने त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. काही वेळानंतर तो ठाण्याच्या आवारात पडून दिसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.बुधवारी उपचारादरम्यान, मारोतीचा चंद्रपुरात मृत्यू झाला. त्यामुळे दोषींविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका तेथे मृताच्या नातलगांनी घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह ठाण्यावर आणण्यात येणार असल्याची चर्चा बुधवारी दुपारपासूनच वणी शहरात होती. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट होती. मात्र दिवसभर अशा कोणत्याही घडामोडी घडल्या नाहीत. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक एका रुग्णवाहिकेत मारूतीचा मृतदेह घेऊन त्याचे नातलग वणीत पोहचले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच, टिळक चौकासह मुख्य मार्गावरील दुकाने लगेच बंद झाली. वणी-यवतमाळ मार्गावर तहसीलजवळ रुग्णवाहिका थांबविण्यात आली. या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आला होता. त्यामुळे शिरपूर, मारेगाव येथील पोलिसांची कुमक वणीत बोलविण्यात आली.दरम्यान, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी मारोतीच्या नातलगांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर नातलगांच्या बाजुने लढा देत असलेले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील धुर्वे यांनी स्वत: याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर जो कुणी दोषी आढळेल, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले.शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीलागुरूवारी वणी येथून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ यवतमाळकडे रवाना झाले. तेथे हे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार आहे. जोपर्यंत मारोती सुरपामला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे धुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.