शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या भूमिअभिलेखचा कारभार चालतो आर्णीवरून

By admin | Updated: July 14, 2016 02:34 IST

येथील तहसील परिसरातील भूमिअभिलेख कार्यालय गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभारावर असून सर्व कारभार आर्णीवरून चालविला जातो.

अधीक्षकांचा कक्ष कुलूपबंद : कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप दिग्रस : येथील तहसील परिसरातील भूमिअभिलेख कार्यालय गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभारावर असून सर्व कारभार आर्णीवरून चालविला जातो. अधीक्षकांच्या कक्षाला तर कायम कुलूप लागलेले असते. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक प्रकरणेही प्रलंबित आहे. महसूल यंत्रणेमध्ये शासन आणि जनतेच्या मालमत्तेची नोंद ठेवणारे कार्यालय म्हणजे भूमिअभिलेख विभाग होय. येथील भूमिअभिलेख उपअधीक्षकांची ४ जून रोजी बदली झाली. त्यानंतर आर्णी येथील बी.व्ही. मस्के यांच्याकडे प्रभार देण्यात आला. त्यामुळे मस्के हे आपल्या सोयीने दिग्रस येथे येतात. योग्य त्याच नोंद घेतात. फेरफारसंबंधी फाईलवर सह्या करतात. ५ जुलै रोजी काही वेळासाठी मस्के येथे आले. आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना पुढील दिवशीपर्यंत नोंदणीसंबंधी कार्यवाही तयार ठेवावी, असे मौखिक आदेश देवून गेले. सदर कार्यालयात २२ पदे असून चार पदे रिक्त आहे. काही कर्मचाऱ्यांकडे दोन-दोन टेबलचे काम आहे. १८ कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी येथे उपस्थित असतात. अधीक्षकच नसल्याने कर्मचारीही बिनधास्त झाले आहे. महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही स्थिती असून यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. प्रभारी भूमिअभिलेख अधीक्षकांची दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताहाचे काम होते. मंगळवारी यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या बैठकीला आणि बुधवारी अमरावती येथे बैठकीला हजर असल्याने आपण येऊ शकलो नाही. १ ते ७ जुलै दरम्यान कोणकोणती कामे केली, अशी विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामे केली व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)