शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

कुरई येथे मुलाने केला जन्मदात्याचा खून

By admin | Updated: July 30, 2016 00:52 IST

घरगुती कारणावरून झालेल्या वादात मुलाने केलेल्या मारहाणीत वडील मृत्युमुखी पडल्याची घटना शिरपूर

घरगुती कारण : १० दिवसांनी उलगडले रहस्य वणी : घरगुती कारणावरून झालेल्या वादात मुलाने केलेल्या मारहाणीत वडील मृत्युमुखी पडल्याची घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरई गावात घडली. गुरूवारी रात्री या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. कवडू राजुरकर (५२) असे मृताचे नाव आहे. १८ जुलै रोजी कवडू राजुरकर याला जखमी अवस्थेत त्याचा मुलगा गणेश राजुरकर याने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. माझे वडिल शेताकडे जात असताना दारूच्या नशेत दगडावर पडून जखमी झाले व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार गणेशने वणी पोलिसांकडे केली होती. वणी पोलिसांनी हे प्रकरण चौैकशीसाठी शिरपूर पोलिसांकडे सोपविले. चौैकशीदरम्यान, कवडूचा मृत्यू डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीने झाला, असा वैद्यकीय अहवाल शिरपूर पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर शिरपूरला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यासह जमादार अशोक इंगोले, जमादार शंकर राजगडकर, शिपाई योगेश ढाले यांनी कुरई येथे जाऊन या प्रकरणाची सखोल चौैकशी केली असता, सत्य उजेडात आले. घटनेच्या दिवशी कवडू राजुरकर व त्याचा मुलगा गणेश या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादात गणेशने कवडूला काठीने बेदम मारहाण केली. त्यात कवडूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गणेश राजुरकर याच्याविरुद्ध भादंवि ३०२, २०१, २०३ अन्वये गुन्हा दाखल करून गुरूवारी रात्री त्याला अटक केली. (कार्यालय प्रतिनिधी)