शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानरचनावाद म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग

By admin | Updated: January 9, 2016 02:53 IST

ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग होय, हा संदेश शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी

आर्णीत तालुकास्तरीय कार्यशाळा : डिजीटल शाळेला कमी खर्चाचा पर्यायआर्णी : ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग होय, हा संदेश शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानरचनावादी तालुकास्तरीय कार्यशाळा आर्णी येथे पार पडली. तिथे डिजीटल शाळा करणे शक्य नाही अशा ठिकाणी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करून मुलांना प्रगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तालुकास्तरीय ज्ञानरचनावादी कार्यशाळेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांच्या पुढाकाराने बीआरसीच्या सभागृहामध्ये शुक्रवारी करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी पुसद तालुक्यातील मनसळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय विश्वकर्मा, सहकारी उपस्थित होते. त्यांनी अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने मुलांना हसत खेळत कसे शिकविता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यात पहिल्या वर्गातील विद्यार्थीही लिहिण्यात, बोलण्यात आणि ओळखण्यात कशा पद्धतीने तरबेज होवू शकतात, हे या प्रात्यक्षिकातून शिक्षकांपुढे मांडण्यात आले. मागील १३ वर्षांपासून विश्वकर्मा ज्ञानरचनावादी पद्धतीचे अध्यापन प्रामाणिकपणे करत आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून किंवा इतर कोणाकडूनही त्यांना लोकवर्गणीची कधीच गरज पडली नाही. ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये लागणारे साहित्य मी स्वत: तयार केले. आज माझ्या शाळेमध्ये ही पद्धत पाहण्यासाठी अनेकजण येतात, असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी डिजीटल शाळा असली तरी वीज पुरवठा अनियमित असल्याने अडचणी येतात. याला सशक्त पर्याय म्हणजे ज्ञानरचनावाद पद्धत उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले. ज्ञानरचनावाद तालुकास्तरीय कार्यशाळेला तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका, गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, विस्तार अधिकारी शुभदा पाटील व इतर सहकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)