शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

७६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची लागवड

By admin | Updated: May 30, 2017 01:21 IST

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत.

पुसद तालुका : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. त्यानंतर शेतकरी खत व बियाणे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. तालुक्यात खरीपाचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काढणी केली. त्यानंतर काही दिवस उसंत घेऊन बैलजोडी ज्यांच्याकडे आहे, अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या मदतीने तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे पूर्ण केली. ४५ ते ४६ अंश एवढे तापमान असतानाही बळीराजा सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ३.३० ते ७ या वेळेत मशागतीची कामे पूर्ण करीत होता. आता ही कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर आता पेरणीची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी मग्न आहे. पुसद तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यासाठी बी-बियाणे, खते कमी पडणार नाही, याची चाचपणी कृषी विभाग कटाक्षाने घेत आहे. साधारणत: दरवर्षीचा अनुभव पाहता खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेवर धावपळ होते. अशा वेळी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागते. दरवर्षी मागणीच्या तुलनेत या बियाण्यांचा पुरवठा हा कमी असतो. ही परिस्थिती यंदा बदलणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारल्या जात आहे. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या पेरणीला पसंती देत आहेत. तीन ते साडेतीन महिन्यात या पिकांची काढणी होते. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. शिवाय साडेतीन महिन्यांनंतर सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्याच शेतात रबी हंगामातील पिके घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा पाऊस वेळेवर होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकतागेल्या काही वर्षात दुय्यम दर्जाची बियाणे व खते बाजारात विक्रीसाठी येतात. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यावेळीसुद्धा साशंकता दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांना विश्वास देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांबाबत कोणतीही शंका आल्यास त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे गरजेचे आहे, परंतु अनेकवेळा तक्रारींची दखल घेतलीच जात नसल्याचे शेतकरी सांगतात.