शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कौशिकी चक्रवर्ती यांची आज हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफल

By admin | Updated: November 24, 2015 05:46 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृती समारोहानिमित्त मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफल आणि बुधवार २५ नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळावर संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबूजींच्या स्मृतीदिन समारोहानिमित्त प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता बाबूजीचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर करण्यात आले आहे. बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी यवतमाळकर रसिकांना संगीताची मेजवाणी असते. यावर्षी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारा आणि अनेक मोठ्या संगीत समारोहातून आपल्या गायिकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कौशिकी चक्रवर्ती यवतमाळकरांना संगीताची मेजवाणी देणार आहे. या मैफलीला संदीप घोष तबल्यावर तर अजय जोगळेकर हार्मोनियमवर साथ देणार आहे.इनामी काटा कुस्त्यांची दंगलयवतमाळच्या ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार आहे. ४बाबूजींच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन आणि उर्वरिक राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी नागरी उड्ड्यन मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रतिथयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.