शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जळका-धानोरा गटात प्रतिष्ठेची लढत

By admin | Updated: February 13, 2017 01:21 IST

नगरपंचायत झाल्याने नवनिर्मित जळका जिल्हा परिषद गटात तीनही प्रमुख पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.

तूल्यबळ उमेदवार : काँग्रेस, भाजप, सेनेची प्रतिष्ठा पणाला, नवीन जिल्हा परिषद गट राळेगाव : नगरपंचायत झाल्याने नवनिर्मित जळका जिल्हा परिषद गटात तीनही प्रमुख पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. सीमा तेलंगे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांनी याआधी वरध जिल्हा परिषद गटातून विजय मिळविला आहे. जळका हा गट त्यांच्यासाठी नवा असला तरी आपण राबविलेल्या विकास कामांचा पाढा वाचत त्या मताचा जोगवा मागत आहे. सोबतच जळका पंचायत समिती गणातून नलिनी पराते, धानोरा गणातून मंगला ठाकरे या खिंड लढवित आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके आणि काँग्रेस नेत्यांची फौज गट पिंजून काढत आहे. यापूर्वी सदर गटामध्ये राळेगाव शहर होते. मिलिंद धुर्वे यांच्या रूपाने जिल्हा परिषद सदस्य होते. काँग्रेस व भाजपाला या गटातून विजय मिळविता आला नव्हता. आता दोनही प्रमुख पक्षांनी या गटावर दावा करताना संपूर्ण विकासाचा पाढा वाचणे सुरू केले आहे. भाजपाने उषा बाबाराव भोयर यांना उमेदवारी दिली आहे. याआधी त्यांनी राळेगाव गट असताना निवडणूक लढविली होती. हेवीवेट उमेदवार असा त्यांचा परिचय आहे. भाजपाने त्यांना सहा महिन्यांपूर्वीच उमेदवारी बहाल केली होती. त्यांच्या समवेत धानोरा गणातून स्नेहा विजय येनोरकर व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या सक्षम उमेदवाराची साथ तसेच जळका गणातून सरपंच मारोती सलाम यांच्या पत्नी शीला सलाम यांना उमेदवारी दिल्याने सक्षम महिला उमेदवारांची टीम त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेने या मतदारसंघासाठी प्रगतशील शेतकरी प्रकाशराव देशमुख यांच्या पत्नी ज्योती प्रकाशराव कुलकर्णी यांना उमेदवारी देवून मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. देशमुख यांचा या परिसरात दबदबा आहे. सामाजिक भूमिका, शिवसैनिकांची साथ तसेच जळका गणातून अलका धुर्वे, धानोरा गणातून माधुरी सुरेंद्र भटकर या उमेदवारांचीही त्यांना साथ मिळत आहे. सेनेला येथे मोठ्या अपेक्षा आहे.