लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पणन महासंघाने ३ मेपासून कापूस खरेदी सुरू केली. ३१ मेपर्यंत संपूर्ण कापूस खरेदी करण्याचे नियोजन होते. मात्र मनुष्यबळाची कमतरता, जिनिंगचा अभाव आणि अतिरिक्त कापसाचा पडलेला ताण यामुळे सहा लाख क्विंटल कापूस खरेदीचे उद्दिष्ट गाठणे आव्हान ठरणार आहे.३ ते १५ मेपर्यंत दोन लाख २० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. १९ हजार शेतकऱ्यांकडील तीन लाख ८० हजार क्विंटल कापूस शेतकºयांच्या घरात पडून आहे. या कापसाचे ३१ मेपर्यंत मोजमाप होईल, अशी पणनला अपेक्षा होती. सध्याची परिस्थिती पाहता हे मोजमाप पावसाळ्यापूर्वी होणे अशक्य आहे.जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक शेतमालाचा ताण जिनिंगवर पडत आहे. यासोबतच पुढील १२ दिवसांत येणाऱ्या शासकीय सुट्या आणि पावसाचे वातावरण यातून कापूस विक्रीच्या अडचणीत भर पडणार आहे.या काळात कापूस खरेदी न झाल्यास जूनमध्येही कापूस खरेदी होणार आहे. मात्र शेतकºयांना तातडीने पेरणीसाठी पैसा हवा आहे. त्याकरिता ते जूनपूर्वीच कापूस विकण्याच्या मानसिकतेत आहे. शिवाय कापसाची गुणवत्ताही खराब होण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात शेतकºयांचा कापूस खरेदी करण्यासाठी शेड असणारे जीन आवश्यक आहेत. कापूस, सरकी ओली होणार नाही, अशी संपूर्ण व्यवस्था पाहिजे आहे. तशी स्थिती अनेक केंद्रांवर नाही. यातून शेतकरी अडचणीत येणार आहेत. एकूणच तीन लाख ८० क्विंटल कापूस खरेदीचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.२२ मे रोजी ‘एक मूठ कापूस जाळा’ आंदोलनशासकीय खरेदीच्या धिम्या गतीने कोट्यवधीच्या कापसाची माती होत आहे. शासनाच्या कापूस खरेदीमधील निरूत्साहाचा निषेध नोंदविण्यासाठी २२ मे रोजी ‘एक मूठ कापूस जाळा’ आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकरी आपल्या घरासमोर हे आंदोलन करणार आहे. २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात शेतकरी कापूस जाळा आंदोलन करणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक री या आंदोलनात सहभाग नोंदविणार आहे. यामध्ये यवतमाळचा समावेश आहे. शेतकºयांनी व्यापाºयांना कापूस विकल्यास हमीदरातील तफावत रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. प्रत्येक गावात हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
३१ मेपूर्वी सर्व कापूस खरेदी आटोपणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST
जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक शेतमालाचा ताण जिनिंगवर पडत आहे. यासोबतच पुढील १२ दिवसांत येणाऱ्या शासकीय सुट्या आणि पावसाचे वातावरण यातून कापूस विक्रीच्या अडचणीत भर पडणार आहे.
३१ मेपूर्वी सर्व कापूस खरेदी आटोपणे अशक्य
ठळक मुद्देजिनिंगवर ताण : आणखी चार लाख क्विंटल शेतकऱ्यांच्या घरात