शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत.

ठळक मुद्देनातेवाईक फिरकेनात : अंत्यसंस्कारासाठी नऊ हजारांचे ‘पॅकेज’

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सर्वच धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह त्याग केल्यानंतर आत्म्याचा इहलाेकीचा प्रवास सुरू हाेताे. देहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ताे पंचत्वात विलीन हाेतो. अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत. काेराेना आजाराबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकदा तपासण्या करून पाॅझिटिव्ह आलेली व्यक्ती मृत्यूच्या पूर्वी निगेटिव्ह येते. अशा मृतांची संख्याही माेठी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यच येत नाहीत. त्यामुळे मुलांनाच आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्याने उचलावी लागते. अनेकांना तर मृत्यू झाल्यानंतर घरापर्यंतही आणले जात नाही. इतकी भीती आहे. पूर्वी शेजारी, मित्रमंडळी ज्या घरी मृत्यू झाला तेथे आवर्जून जात. काय हवं नकाे ते पाहत हाेते. इतकंच काय ज्या घरात मयत झाली तेथील चूल पेटविली जात नव्हती. त्यामुळे शेजारीपाजारीच किंवा नातेवाइकांकडूनच जेवण, चहा, नाश्ता याची व्यवस्था केली जाई. काेराेना महामारीच्या दहशतीमुळे आता हा संस्कारच मागे पडला आहे. कधीकाळी महानगरात घडलेले प्रकार आता यवतमाळसारख्या लहानशा शहरात पाहावयास मिळत आहेत.  कोरोना महामारी आणखी कुठल्या पातळीवर नेते याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.  

गरिबांना अत्यंंविधीच्या पॅकेजचा खर्च न परवडणारा 

काेराेना संशयिताचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला जाताे. त्यासाठी ठराविक रकमेचे पॅकेज माेजले जाते. अंत्यविधीला मदत करणाऱ्यांना साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. यात ते रुग्णवाहिकेसह सर्व सुविधा पाेहाेचवितात. नंतर स्मशानात सरणाच्या लाकडाकरिता साडेतीन हजार रुपये घेतले जातात. हा नऊ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च गरिबांना न परवडणारा आहे; मात्र अडचण असल्याने त्यांचाही नाइलाज झाला आहे. काळाच्या ओघात अंत्यविधी हा पार पाडणे कठीण झाले आहे. पॅकेजमध्ये केवळ मृतदेहाला अग्नी दिला जाताे. दुसऱ्या दिवशी राख नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. यावरून काेराेनामुळे मानवी जनजीवन किती ढवळून निघालंय याची प्रचिती       येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू