शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार तूर उत्पादकांची चौकशी

By admin | Updated: May 29, 2017 00:41 IST

जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका

जादा विक्रीचा संशय : सहायक निबंधकांना कारवाईचे निर्देश रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी अशा शेतकऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात १५ शासकीय तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत तब्बल दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. ही तूर शेतकऱ्यांची, की व्यापाऱ्यांची, याचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. काही शेतकऱ्यांच्या नावे जादा तूर विकल्याचे आढळले होते. यात काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारावर आपली तूर विकल्याचे आढळले होते. त्यामुणे प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना चौकशीचे आदेश दिले. आता सर्व सहाय्यक निबंधकांनी जादा तूर विक्रीची चौकशी सुरू केली. यात २५ क्विंटलपेक्षा जादा अथवा शासकीय नियमांचे उल्लंघन करून तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राने अशा १०० शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधकांना सादर केली. १५ केंद्रांवरील या दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी होणार आहे. यवतमाळ, दारव्हा व नेर केंद्राने शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. पुसद आणि महागाव केंद्रावरील शेतकऱ्यांचे दस्तावेज तपासले जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास शेतकऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर जादा तूर विक्री झाली, ते संकटात सापडणार आहे. निम्म्या शेतकऱ्यांची चौकशीला पाठ सहाय्यक निबंधकांनी या शेतकऱ्यांना नोटीस बजावून चौकशीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र नोटीस मिळूनही धास्तीमुळे अनेक शेतकरी दस्तावेज घेऊन आलेच नाही. आता जे शेतकरी केंद्रात चौकशीला आले नाही, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना फेरनोटीस बजावण्यात येणार आहे. यानंतरही शेतकरी न आल्यास उपलब्ध दस्तावेजानुसार त्यांच्यावर फौजदारीची कारवाई केली जाणार आहे. आम्हाला चोर समजता का ? नोटीस बजावल्यानंतर काही शेतक ऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. त्यांनी शेती व त्यात पिकविलेली तूर, याची माहिती त्यांना दिली. प्रचंड संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्हाला चोर समजता का’, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारला. यामुळे आता लोकप्रतिनिधी सहाय्यक निबंधकांना धारेवर धरत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात चौकशी प्रकरणात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.