शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

टँकरच्या पाण्याने संसर्गाचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:13 IST

टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी .....

ठळक मुद्देपाणी टंचाईचा परिणाम : अंगावर पुरळ, खाज, लालचट्टे, पचनाचे आजार, उलट्या आणि हगवण

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी प्राशन केल्याने पचनाचे विकार आणि जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. टँकरचे पाणी तापवूनच वापरण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभरानंतर येणाºया नळामुळे प्रत्येकालाच टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. शहरातील जलस्रोत आटल्याने सांडपाण्याच्या नाल्यावरील विहिरींचे थेट पाणी टँकरमध्ये भरुन वितरित केले जाते. या विहिरींची निर्जंतुकीकरण न करताच पाणी वितरित होत आहे. परिणामी अनेक वस्त्यांमध्ये अ‍ॅलर्जिक आणि त्वचेच्या संसर्गाचे आजार बळावत आहेत.शहरातील वंजारीफैल, गवळीपुरा, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, इंदिरानगर, पिंपळगाव या परिसरात नागरिकांना पुरळ, खाज, चट्टे झाल्याच्या तक्रारी वाढत आहे. अनेक भागात टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. यातून पचनाचे विकार जडले असून अनेकांना पाणी पिल्यानंतर मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास होत आहे.टँकरद्वारे येणाºया पाण्याला उग्र वास येतो. अनेक टँकरमधील पाणी हिरव्या रंगाचे असते. घरी पाणी साठविल्यानंतर दोन-तीन दिवसातच त्यात चामडोक पडतात. अनेक ठिकाणी तर साठविलेल्या पाण्यात शेपटी असलेल्या अळ्याही आढळून येतात. हेच पाणी आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी वापरले जाते. त्यातून आजार पसरत आहेत.शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून सातत्याने संसर्गजन्य आजार होत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक टँकरमध्ये पाणी भरताना ते शुद्ध असते असे सांगितले जाते. मात्र टँकर वेळोवेळी साफ केले जात नसल्याने शुद्ध पाणीही त्यात दूषित होते. यातूनच नागरिकांना संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे दिसून येते. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पाणी उकळूनच वापराटँकरद्वारे आलेले पाणी दूषित असल्यास वापरण्यापूर्वी ते उकळून घेणे गरजेचे आहे. पाणी तापविल्याने त्यातील बुरशी आणि जलजन्य आजाराला कारणीभूत ठरणारे घटक नाहीसे होतात. दररोज पाण्याचा वापर करण्यापूर्वी पाणी तापविणे शक्य नसल्यास काही काळ ते उन्हात गरम केल्यानंतर त्याचा वापर करावा. टँकरच्या पाण्याने धुतलेले कपडे कडक उन्हात वाळू द्यावे. यामुळे संसर्गाचा धोका पूर्णत: कमी करता येऊ शकतो.वापराचे व पिण्याच्या पाण्याचे एकच टँकरपाणी वितरणासाठी टँकर लावले असून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था कुठेही दिसत नाही. वापराचे पाणी वितरण करणाºया टँकरमधूनच पिण्याचे पाणीही दिले जाते. यामुळे शुद्ध असलेले पिण्याचे पाणी अशुद्ध टँकरमध्ये सोडताच दूषित होते. यातूनही जलजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे.