शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश आजाराने जवळगाव येथे बालिकेचा मृत्यू

By admin | Updated: May 30, 2014 00:25 IST

तालुक्यातील जवळगाव येथे डेंग्यूसदृश आजाराचा कहर कायमच असून गुरुवारी नागपूर येथे उपचार घेत असलेल्या एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आरोग्य

किशोर वंजारी - नेरतालुक्यातील जवळगाव येथे डेंग्यूसदृश आजाराचा कहर कायमच असून गुरुवारी नागपूर येथे उपचार घेत असलेल्या एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा अद्यापही निद्रिस्त असल्याचे दिसून येते. जवळगाव येथे गेल्या दीड महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत ४२ जणांना लागण झाली आहे. यातील तीन बालके नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यापैकी राधा सुधीर गुघाने (७) या बालिकेचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तन्मय सुजित कुंभारे, खुशी मानकर या दोन बालकांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. तसेच प्रथमेश गावंडे, वेदिका निंबर्ते, सिद्धार्थ दाढे, यश गावंडे, आदित्य गुघाने, कृष्णा गावंडे, सृष्टी निंबर्ते, गार्गी गुघाने, सर्मथ गुघाने यांच्यासह ४२ जण डेंग्यूसदृश आजाराने बाधित आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी जवळगाव येथे भेट दिली. त्यावेळी गावात दहशीतीचे वातावरण दिसून आले. बालिकेच्या मृत्यूने गावावर शोककळा होती. तर डेंग्यूसदृश आजाराच्या भीतीने लहान मुलांना बाहेरगावी हलविल्याचे दिसून आले. गावातील पाण्यात नियमित ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नसल्याचे पुढे आले. डेंग्यूसदृश आजाराचा प्रकोप गावात सुरू असताना पाणी स्वच्छतेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. गावात गटाराचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसून आले. आरोग्य विभागाच्यावतीने गावात फवारणी करण्यात आली असली तरी त्याचाही उपयोग दिसत नाही. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्यावतीने ठोस उपाययोजना करताना दिसून आले नाही. केवळ जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने गावाला भेट देऊन पाहणी केली. सदर गाव बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून गावापासून ते २५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गैरसोय होते. आरोग्य यंत्रणाही गावापर्यंत पोहोचण्यास असर्मथ असते. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष होते.