शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी रंगतदार लढतींचे संकेत

By admin | Updated: January 22, 2017 00:04 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे.

निवडणूक : बसपा, एमआयएम, मनसे, विदर्भवादीही रिंगणात यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे. या निवडणुकीत आघाडी होण्याची कुणकुण सुरू असून युती मात्र दुभंगलेलीच राहणार आहे. जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आत्तापर्यंत अपवाद वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राज्यस्तरावर भाजपा आणि शिवसेनेत युती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र या दोन्ही पक्षांनी युतीचे पर्याय स्थानिक स्तरावर बहाल केल्याने ती शक्यता संपुष्टात आली आहे. युतीची शक्यता दुरावली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून वरिष्ठांच्या अंतिम निर्णयानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची चर्चा आहे. या आघाडीमुळे भाजप व शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून वितुष्ट झाल्याने भाजपाला ही निवडणूक अत्यंत जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, एमआयएम, बसपा, विदर्भवादी संघटना आदींचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. परिणामी ही निवडणूक यावेळी प्रथमच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास चौरंगी, तर आघाडी न झाल्यास पंचरंगी लढती होण्याचे संकेत आहे. काही ठिकाणी तगडे अपक्षही या पक्षांना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी) कळंब : भाजपा, काँग्रेस की स्वतंत्र ? कळंब तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे दिग्रस तालुक्यातील मातब्बर काँग्रेस पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. राळेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या गटाने पक्ष मुलाखतींना हजेरी लावल्याने ही बाब उघड झाली. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जवळपास सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.