शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

इनामी काट्या कुस्त्यांच्या दंगलीचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: November 26, 2015 02:51 IST

येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात आयोजित काटा कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन बुधवारी माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते...

५०० मल्ल : अकोल्याच्या पहेलवानाने जिंकली उद्घाटनीय कुस्तीयवतमाळ : येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात आयोजित काटा कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन बुधवारी माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते हौदाचे पूजन व कुस्तीची जोड लावून करण्यात आले. जिल्हा कुस्तीगीर संघटनेने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत देशभरातील पाचशेहून अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा आणि वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी या स्पर्धेला हजेरी लावली. खासदार विजय दर्डा यांचा यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्कार केला. विविध ठिकाणाहून आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा आनंद त्यांनी लुटला. खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते कुस्तीचा जोडही यावेळी लावण्यात आला. उद्घाटनीय कुस्ती सिद्धोधन गाडेकर (बाळापूर) आणि तेजस पहेल मोगरे यवतमाळ या मल्लांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, प्रताप पारसकर, दीपक ठाकूर, कुलभूषण तिवारी, सुरेश जयसिंगपुरे, उद्धव बाकडे आदी उपस्थित होते. उद्घाटनीय कुस्ती सिद्धोधन पहेलवानाने मोगरे पहेलवानाला चीत करून जिंकली. उद्घाटनानंतर १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपयांच्या कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. या कुस्तीत दहा वर्षाच्या मल्लांपासून साठ वर्षाच्या मल्लांनी सहभाग नोंदविला. संध्याकाळी १२ ते १ क्रमांकाच्या इनामी कुस्त्यांना सुरूवात झाली होती. जिल्हा कुस्ती संघटनेतर्फे सलग १२ व्या वर्षी आयोजित कुस्त्यांच्या या दंगलीत यावर्षी सात लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. या स्पर्धेत दिल्लीचा कुलदीप पहेलवान, भिलाईचा अवधेश पहेलवान, हरियाणा, भिलवाडा (राजस्थान) च्या पहेलवानांसोबतच पुण्यातील महादेव सरगर, गणेश जगताप, संग्राम पाटील, शिवराज राक्षे, बाला जरे, आबा अटकळे, देवानंद पवार, शरद पवार आदी नामांकित मल्ल सहभागी झाले आहे. तसेच हिंगोली, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, पुसद, नांदेड येथील मल्लही सहभागी झाले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)