शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संशयिताकडेच अवैध वृक्षतोडीची चौकशी !

By admin | Updated: October 21, 2015 02:53 IST

ज्या यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांच्या सागवानाची अवैधरीत्या कत्तल झाली,

लपवाछपवी उघड : फेरचौकशीचे आदेशयवतमाळ : ज्या यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांच्या सागवानाची अवैधरीत्या कत्तल झाली, त्याच अधिकाऱ्याकडे याची चौकशी सोपविली गेल्याने मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.पांढरकवडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सागवानाचा ट्रक पकडला होता. त्यातून सुमारे सहा लाखांचे सागवान जप्त केले गेले. याप्रकरणी चालक-वाहक तसेच हिवरीतील दलाल व दोन मजूर अशा पाच जणांना अटक केली गेली. यातील म्होरक्या शेख चांद (यवतमाळ) मात्र वनखात्याला हुलकावण्या देतोय. चौकशी दरम्यान जप्त केलेले लाकूड हे यवतमाळ वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपरी जंगलातील असल्याचे निष्पन्न झाले. तेथील भोगवटदार-२ तथा महसुली जमिनीतील ही वृक्षतोड असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष झाडांची कटाई करणाऱ्या मजुरांनीही पिंपरीतील तो स्पॉट दाखविला. पांढरकवडा येथील सहायक वनसंरक्षक नंदकिशोर जगताप यांच्याकडे ही चौकशी सोपविली असली तरी ते आपली चौकशी ट्रकमधील जप्त मालापर्यंतच मर्यादित ठेवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उर्वरित वृक्ष कटाईचे काय, असा प्रश्न पुढे आला. कारण याप्रकरणातील चालकाने आपण यापूर्वी पाच ट्रक सागवान आंध्र प्रदेशात नेल्याची कबुली पांढरकवडा आरएफओला बयाणात दिली होती. शिवाय यवतमाळ आरएफओंनी सुमारे दोन ट्रक सागवान जोडमोहा डेपोत कोणत्याही पंचनामा व पीओआर शिवाय परस्परच जमा केले. त्यामुळे हे एकूण सात ट्रक सागवान नेमके कुठून आले याचे गूढ कायम आहे. पिंपरी, चिचबर्डी, वाघापूर, लासीना या जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. यवतमाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी आपली चौकशी पिंपरीतील जंगलातच संपविण्याचा प्रयत्न चालविला. त्यांनी केलेल्या चौकशीत लपवाछपवी होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी त्यांना फेरचौकशीचे आदेश दिले. मात्र ज्यांच्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांची अवैध वृक्षतोड झाली, तो अधिकारी किती प्रामाणिकपणे ही वृक्षतोड रेकॉर्डवर दाखवेल याबाबत साशंकता आहे. आरएफओ मडावींच्याच हद्दीतील जंगलात वृक्षतोड झाली असताना मुख्य वनसंरक्षकांनी त्यांच्याचकडे ही चौकशी सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ‘सीसीएफ’ पोहोचले सावळीच्या जंगलातसावळीसदोबा : येथील घनदाट जंगलात तब्बल १५० परिपक्व सागवान वृक्षांची आठवडाभरापूर्वी अवैध कत्तल करून ते मराठवाड्यात पाठविले गेले. वनविभागाने माहूर वनपरिक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी भल्या मोठ्या ताफ्यासह भल्या पहाटे धाड घातली होती. तेव्हा अवघ्या २६ हजारांच्या रिपा त्यांच्या हाती लागल्या. मात्र या जप्तीलाच ‘कामगिरी’ दाखविण्याचाही प्रयत्न झाला. या वृक्षतोडीची दखल घेऊन यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) व्ही.व्ही. गुरमे मंगळवारी सावळीसदोबाच्या जंगलात पोहोचले. त्यांनी तेथे वृक्षतोड व त्याच्या थुटांची पाहणी केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी मंगळवारी मराठवाड्यातील वडसा (पडसा) येथे धाड टाकून सागवान जप्त केले. माळेगाव, दातोडी, वरूड (तुका) जंगलातील परिवक्व सागवान कत्तलीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. माळेगाव, दातोडी, वरूड (तु) ही गावे मराठवाडा सीमेवर आहे. या जंगलातील वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.एच. जाधव कार्यरत आहे. यानंतरही पैनगंगा नदीतून लाकूड चोरी होत आहे. यवतमाळ आणि पांढरकवडा येथील मोबाईल स्कॉड आठवडाभरापासून येथे ठाण मांडून आहे. बीट दरोगा बालाजी चव्हाण आणि वनरक्षक बांगर हे या बीटमध्ये कार्यरत आहे. चौकशीअंती कुणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)