शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता..!

By admin | Updated: January 22, 2017 00:09 IST

मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता... ‘दिवार’ सिनेमात बुट पॉलीश करणारा बाल अमिताभ जेव्हा हे वाक्य बोलला, तेव्हा प्रेक्षक दिवाने झाले होते.

छोट्या करणचा बाणा : सातवीचा विद्यार्थी चमकवतो बूट अन् स्वत:चे स्वप्नही अविनाश साबापुरे  यवतमाळ मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता... ‘दिवार’ सिनेमात बुट पॉलीश करणारा बाल अमिताभ जेव्हा हे वाक्य बोलला, तेव्हा प्रेक्षक दिवाने झाले होते. तोच स्वाभिमान, तोच कणखर बाणा यवतमाळच्या तहसील चौकात शुक्रवारी दिसला. तेरा वर्षांच्या करणने बुट पॉलीश करून दिला. ग्राहकाने नोट दिली. पण देता-देता हातून निसटून खाली पडली. पोराने पैशांकडे पाहिलेही नाही. ग्राहक झुकला. नोट उचलली अन् लहानग्या करणच्या खिशात कोंबली. करणने अँग्री यंग मॅनचा प्रसिद्ध डायलॉग म्हटला नाही, पण त्याच्या नजरेची भाषा ग्राहकाला कळली. पोराचे काम पाहून जाता-जाता ग्राहकाने त्याला जादा दहा रुपये देण्याचा प्रयत्न केला. पण पोरगा म्हणाला, ‘जेवढं काम केलं तेवढेच पैसे पाह्यजे.’ तहसील चौकात इतरांचे बुट पॉलीश करून देणारा हा पोरगा आहे करण ! तो काही शाळाबाह्य नाही. शाळेबाहेरच्या जगातही तो प्रत्यक्ष जगण्याचे धडे गिरवत आहे. भोसा परिसरातील एका राजकीय नेत्याच्या शाळेत तो सातवीत शिकतो. ‘सहावीत माह्यावाला वर्गातून दुसरा नंबर आला होता...’ करणने अभिमानाने सांगितले. भोसाच्या सुंदरनगर भागात त्याचे घर आहे. वडील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतात. काकाचे तहसील चौकात बुट पॉलीशचे दुकान आहे. शाळा सुटल्यावर करण तेथे स्वखुशीने येतो. ‘मले पोलीस बनाचं हाय. त्येच्यासाठीच तं शाळेत जातो. सकाळी न् संध्याकाळी बी व्यायाम करतो. अभ्यास आपला राच्च्याले...’ करणची दिनचर्या समजून घेताना त्याचे डोळे बरेच काही सांगत होते. शाळेच्या स्पर्धेत कबड्डीत उत्तम खेळल्यामुळे करणला प्रमाणपत्र मिळाले आहे. मोठे होऊन पोलीस व्हायचे आहे, हे स्वप्न तो जेव्हा बोलून दाखवतो, तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकतात. पण दररोज बाहेरची दुनियादारी प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या करणच्या स्वप्नाला वास्तवाचे भानही आहे. म्हणूनच तो म्हणाला, ‘पोलीस तं बनाचंच हाय. पण समजा नाहीच झालो पोलीस तं हे (दुकानातलं) काम हायेच. म्हणून तं दुकानात बसतो येऊन...’ स्वत:च्या पायावर उभं होता आलं पाहिजे, या ध्यासातून करण आतापासूनच कामाला लागला आहे. म्हणूनच त्याच्या देहबोलीतून अँग्री यंग मॅनची ‘मैं फेके हुए पैसे नही उठाता’ ही भाषा झळकते. लहानशा वयात अन् गरिबीच्या अंधारातही स्वाभिमानाचे बाळकडू करणच्या नसा-नसात आहे. मित्राने दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे लॉकेट गळ्यात तो अभिमानाने मिरवतो अन् सांगतो... ‘तेच्यावर शिवाजी हाय. मले आवडते!’