शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो विद्यार्थी उपोषणावर

By admin | Updated: July 30, 2016 00:51 IST

अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेले शेकडो विद्यार्थी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे ...

वणी : अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेले शेकडो विद्यार्थी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत, तर स्वप्नील धुर्वे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. वणी उपविभागातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी ५ जुलैै रोजी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली १८३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागेल त्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल व कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र २० दिवस लोटूनही वणी उपविभागातील १४० विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून अद्यापही वंचित आहेत. त्यांचे प्रवेश तातडीने करून देण्यात यावेत, यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर स्वप्नील धुर्वे यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला, तर त्यांच्या समवेत ७९ विद्यार्थीनी व ७१ विद्यार्थी अशा एकूण १४० विद्यार्थ्यांनी विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे विकेश पानघाटे, प्रविण खानझोडे, अखील सातोकर, सिद्धीक रंगरेज, श्रीकांत ठाकरे, ज्ञानदीप निमसटकर, संदेश तिखट, वैभव डंभारे, प्रमोद एडलावार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी) विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय किसान मजदूर संघ, स्वराज्य युवा संघटना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी बहुजन स्टुडंट फेडरेशन, ग्राहक संरक्षण संस्था, एफएएम, संत गाडगेबाबा युवा विचार मंच आदी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.