शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे शाळा शौचालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:32 IST

नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देमुलींची कुचंबणा : १५ शाळांमध्ये पिण्याचे पाणीही नाही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या निश्चित करणे, विद्यार्थी संख्या घटल्यास शाळाच बंद करणे अशा कायद्यातील तरतुदींचा सोईस्कर वापर करीत जिल्हा परिषद प्रशासन शाळांवर होणारा खर्च कमी करण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र त्यासाठी ज्या आरटीई कायद्याचा आधार घेतला जात आहे, त्याच कायद्यात प्राथमिक शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची तरतूद आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शाळांमधील भौतिक सुविधा पूर्ण करणे, त्यासाठी निधी उपलब्ध करणे या बाबी समग्र शिक्षा अभियानावरच लोटून जिल्हा परिषदेने हात झटकले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित चालणाºया शाळांसाठी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेकडून अत्यल्प खर्च होतो. महत्त्वाच्या खर्चाच्या बाबींसाठी सर्वशिक्षा अभियानाच्या अंदाजपत्रकावर भिस्त ठेवण्यात आली आहे. मात्र समग्र शिक्षाचे अंदाजपत्रक वर्षातून एकदाच आणि तेही शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर अंतिम होते. त्यानंतर प्रत्यक्ष निधी येणे, त्यावर जिल्हा परिषदेचे शिक्कामोर्तब होऊन प्रत्यक्ष शाळेपर्यंत पैसा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी निघून जातो.याच लांबलचक प्रक्रियेमुळे दीडशे शाळांमध्ये अद्याप शौचालय उपलब्ध होऊ शकलेले नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या मुंबई कार्यालयाकडे जिल्हास्तरीय यंत्रणेने निधी मागितला आहे. ७८ शाळांमध्ये मुलांसाठी, ५२ शाळांमध्ये मुलींसाठी तर १८ शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयाची गरज आहे. त्यासाठी तीन कोटी ४६ लाख २० हजारांच्या खर्चाला परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्याप राज्याचेच अंदाजपत्रक अंतिम न झाल्यामुळे जिल्ह्यातील या दीडशे शाळांना निधी मिळण्यासाठी विलंब होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य कुठे-कुठे पुरणार?जिल्हा परिषदेच्या सदस्यांना वर्षाचा अत्यल्प निधी मिळतो. एका जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या किमान ५० शाळा येतात. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्याच्या निधीतून यातील बहुतांश शाळांची दुरुस्ती होणे शक्य नाही. तरीही काही सदस्य समस्येची तीव्रता पाहून काही शाळांमध्ये खर्च करतात. परंतु अशा शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. उर्वरित शाळांसाठी जिल्हा परिषद समग्र शिक्षाच्या निधीशिवाय कुठलाही पैसा देत नाही, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली.१५ शाळांच्या पाण्यासाठी हवे २२ लाखवाई हातोला, चिंचवाडी, राजना, लोहरा, सोनखास, नागेशवाडी, सातघरी तांडा, नांदगव्हाण, माळवाकद, हिवळणी, बोरी ईजारा, बाबासाहेबनगर, पिंपळखुटी, टिपेश्वर, कोठा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक तर पाण्याची सोयच नाही, जिथे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच समग्र शिक्षा अभियानाकडे २२ लाख ५० हजारांचा निधी मागण्यात आला आहे. या निधीतून १५ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मात्र समग्र शिक्षाचा निधी येण्यापूर्वी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.