शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण रखडले

By admin | Updated: December 19, 2015 02:23 IST

जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या व्यवहारात झालेला गौडबंगाल अद्याप गुलदस्त्यात आहे.

अहवालास टाळाटाळ : आॅडिटर्सला सहसंचालकांची नोटीस यवतमाळ : जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या व्यवहारात झालेला गौडबंगाल अद्याप गुलदस्त्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खर्चाचे आॅडिट लोकल फंडमार्फत केले जाते. परंतु यासाठी पुरेसे कर्मचारी नाही. अनेकदा कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी शेजारी जिल्ह्यातील आॅडिटर्स बोलवावे लागतात. आजच्या घडीला यवतमाळ जिल्ह्यात लोकल फंडकडे केवळ २४ आॅडिटर आहेत. त्यांनी गतवर्षीचे पंचायत समित्यांचे आॅडिट पूर्ण केले आहे. आता जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे आॅडिट केले जात आहे. मात्र जिल्ह्यातील एक हजार २०५ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षणाचा अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. आजही अनेक ग्रामपंचायतींचे दोन वर्षांपूर्वीचे आॅडिट सुरू आहे. काही २०१३ मधील तर काही २०१४ मधील ग्रामपंचायतीचे आॅडिट केले जात आहे. दरम्यान अनेक आॅडिटर्सने ग्रामपंचायतींच्या व्यवहाराचे लेखा परीक्षण केले. मात्र पाच ते सहा महिने होऊनही त्याचा अहवाल सादर केलेला नाही. हा प्रकार निदर्शनास येताच अमरावतीचे सहसंचालक सु. ग. सिध्देवाड यांनी विभागातील अशा आॅडिटर्सची यादी मागितली. त्यांना अहवालासाठी वशिष्ट तारीख निश्चित करून देण्यात आली आहे. या निर्धारित तारखेनंतरही रिपोर्ट सादर न झाल्यास त्यांच्यावर वेतनवाढ रोखणे, त्यांना पुन्हा दुसऱ्या वर्षी आॅडिट न देणे या स्वरूपाची कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली. या नोटीसमुळे आॅडिटर्समध्ये एकीकडे दहशत निर्माण झाली आहे. त्याच वेळी त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. विविध स्वरूपांची कामे असल्याने अहवाल सादर करण्यास वेळ मिळत नाही. काम अधिक आणि मनुष्यबळ कमी अशा अडचणी सांगितल्या जात आहे. रविवारी अमरावतीमध्ये आॅॅडिटर्सची बैठक होत आहे. त्यात आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविण्याचा प्रयत्न करायचा काय? यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)३०० रूपयांत मिळतोय रिपोर्टस्थानिक निधी लेखा विभागाच्या यवतमाळ कार्यालयात काही गंभीर प्रकार घडत असल्याची माहितीही पुढे आली आहे. तेथील लिपीकवर्गीय यंत्रणा चिरीमिरी घेऊन आॅडिट रिपोर्ट कुणालाही सहज उपलब्ध करून देत असल्याचे बोलले जाते. वास्तविक हा रिपोर्ट जिल्हा परिषद व पंचायत समितीला सादर केला जातो. तेथूनच तो दिला जाणे क्रमप्राप्त आहे. या संस्थेने न दिल्यास तो लोकल फंडकडे माहितीच्या अधिकारात मागता येतो. मात्र या शासकीय मार्गाने न जाता लिपिकाशी सलगी निर्माण करून हे आॅडिट रिपोर्ट मिळविले जात आहेत. त्यामुळे संबंधितांना आॅडिटमधील आक्षेपांची कारवाईपूर्वीच माहिती मिळत आहे.