शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तहसीलवर धडकले शेकडो शेतकरी

By admin | Updated: October 29, 2014 22:57 IST

निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले.

पुसद : निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले. शेतकऱ्यांनी आजवर अनेक संकटे झेलली. परंतु यंदाचे संकट भीषण आहे. ३० किलो सोयाबीन बियाण्यातून केवळ ५० किलो उत्पन्न येत आहे. यापेक्षा मजुरांची मजुरीच जास्त होत आहे. अपुऱ्या पावसाने कपाशीचे पीकही उद्ध्वस्त झाले आहे. एकरी दहा ते २० हजार खर्च करून हाती काहीच येत नाही. यंदा लागवडीचा खर्चही निघणे अशक्य आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून संपूर्ण पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत तालुक्यातील वेणी, खडकदरी, दहीवड, कोंढई, पाळूवाडी, आसोली, पोखरी या गावातील सुमारे ५०० वर शेतकरी बुधवारी पुसद तहसीलवर धडकले. पुसद तालुका दुष्काळग्रस्त करावा या मागणीसह मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नियमित वीज पुरवठा करावा, रबी हंगामासाठी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उत्तमराव खंदारे, प्रेमराव मस्के, प्रवीण दुद्दल, सूर्यभान टारफे, संजय भोने, माधवराव सुरोशे, गोविंदराव मस्के, नारायण महाराज यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)