शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

सहकारी संस्थांना घरघर

By admin | Updated: May 29, 2014 02:56 IST

एकमेका सहाय्य करुअवघे धरू सुपंथ’ या न्यायाने सहकारातून समृद्धीचे स्वप्न पाहत

पुसद : ‘एकमेका सहाय्य करुअवघे धरू सुपंथ’ या न्यायाने सहकारातून समृद्धीचे स्वप्न पाहत पुसद उपविभागात विविध सहकारी संस्था उभारल्या. तत्कालीन नेते मंडळींनी यासाठी मोठे परिश्रम घेतले. यातून या संस्था नावारुपास आल्यात. मात्र काही काळानंतर सहकार चळवळ मंदावली. सहकारी संस्था म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण अशी काहींची समजूत झाली आणि त्यातच सहकारी चळवळ डबघाईस आली. पुसद परिसरातील साखर कारखाना, दूध उत्पादक सहकारी संस्था, सहकारी जिनिंग प्रेसिंग, सूतगिरणीवर अवकळा आली आहे. एकंदरित पुसद परिसरातील सहकारी संस्थांना जणू ग्रहणच लागले आहे. ‘ब्र’ शब्दही काढत नाही. तसेच कामगारसुद्धा शांत असल्या कारणाने सूतगिरणीचा विषयही शांत आहे.

शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी जुन्या पुसद उपविभागांतर्गत महागाव तालुक्यातील गुंज येथे पुष्पावंती सहकारी साखर कारखान्याची स्थापना माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आली. काही वर्ष हा कारखाना सुस्थितीत चालल्यानंतर कारखान्याला अखेरची घरघर लागली. यातून कारखाना अवसायनात निघाला. कारखान्यावर जप्ती आली. मात्र जागृत शेतकर्‍यांनी जप्ती हाणून पाडली. कारखाना चालवायचा. शेतकरी जगवायचा. यामुळे नाईलाजाने मग कारखान्याला भाडे तत्वावर द्यावे लागले. यासाठी या भागातील नेते मंडळींनी परिश्रम घेतले असते तर कारखान्यावर भाडे तत्वावर जाण्याची पाळीच आली नसती.

यासोबतच पुसद तालुक्यात दुधाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली. एमआयडीसी परिसरात हजारो लिटर क्षमतेचा दूध शीतकरण केंद्र असताना व शेकडो लिटर दूध उत्पादन होऊनही आज या संस्था बंद पडल्या आहेत. कारण काय तर संस्थातील गैरप्रकारामुळे लोकांचा विश्‍वासच राहिला नाही. त्यामुळे कमी भावात का होईना दूध उत्पादक दूध खासगी व्यापार्‍यांना देत आहे. तालुक्यातील मोजक्या दूध उत्पादक संस्था तग धरून आहे.

पुसद शहरातील यवतमाळ जिल्हा सहकारी कापड सूतगिरणी बारा वर्षांंपासून बंद आहे. जवळपास १२00 च्यावर कामगारांचे संसार उघड्यावर पडले. ही सूतगिरणी राजकीय मंडळींच्या भ्रष्ट कारभाराची बळी पडली. नंतरच्या काळात सूतगिरणी सुरू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे ही सूतगिरणी आता तर कायमस्वरुपी काळाच्या आड गेली आहे. कोणताही राजकीय पक्ष याबाबत

पुसद तालुक्यातील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थाही बंद पडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने जिनिंग प्रेसिंगची निर्मिती करण्यात आली हाती. १९९५ पासून या संस्थेला उतरती कळा लागली आणि शेवटी सहा-सात वर्षांंंपासून जिनिंगने अखेरचा श्‍वास घेतला.

या अधोगतीच्या विषयाचा विचार केला तर कुणीही या संस्थेकडे गंभीरतेने पाहिले नसल्याचे दिसून येते. शहरातील सहकारी जिनिंग प्रेसिंगची विस्तीर्ण जागेवर मोटर, रॉड, बेअरिंग व इतर चिल्लर साहित्यावर कुणाचे लक्ष नाही. सहकारी जिनिंगचे आवार क्रीडांगण झाले आहे.

एकंदरित पुसद परिसरातील सहकारी चळवळ अखेरच्या घटका मोजत असून काही संस्था कायमस्वरुपी झोपल्या आहेत. या सहकारी चळवळीत नवसंजीवनी देणारा प्रभावशाली नेतृत्व मिळाले तर पुन्हा एकदा सहकार चळवळ जोमाने उभी राहू शकते आणि शेतकर्‍यांचा विकास होऊ शकतो. मात्र गरज आहे ती सर्व शक्तीने एक होण्याची. (तालुका प्रतिनिधी)