शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:15 IST

तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेसुर्ली व कवडशी वनात गुहा : शिरपूर व कायर येथील किल्ल्याचे अवशेष इतिहासकारांना खुणावतात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणची हेमांडपंथी मंदिरे, किल्ले व गड यांच्या स्मृती देणारे अवशेष केसुर्ली व कवडशीच्या जंगलात आढळणाºया ऐतीहासीक गुहा ह्या इतीहासाची साक्ष देत आहे.ब्रिटीश राजवटीत ‘वुन’ नावाचा जिल्हा असलेले वणी हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षीत राहिले आहे. तालुक्यातील कायर हे गाव तालुक्याचे ठिकाण होते. या गावात मिळालेले प्राचीन शिलालेख हे महत्त्वाचे ठरले आहे. येथील भुडकेश्वर मंदिर, गावाच्या पश्चिमेस असलेली मातीची किल्लेवजा गढी, तिचे प्रवेशद्वार अजूनही कायम अहे. १८८१ मध्ये येथे पोलीस ठाणे होते. त्याची पडकी इमारत अजूनही उभी आहे. शिरपूर येथे अजूनही उभी असलेली दगड मातीची किल्ल्याची भींत व त्या किल्ल्याच्या आत असलेली पायºयाची विहिर व भूयार हे स्मृतीअवशेष ऐतीहासीक राजवटीची साक्ष देतात. मात्र या स्मृती अवशेषाचे जतन करण्यासाठी शासनाचा पुरातत्व विभाग पुढे सरसावत नाही. आता शिरपूरवासीयांनी गावाला आधुनिकतेची झालर लावून गावाची महती कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.येथील उंच टेकडीवर कैलासाचे व दुर्गादेवीचे मंदिर उभारून गावाच्या महतीला उजाळा दिला आहे. कैलास शिखर मंदिराला तिर्थस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. आता शासनाकडून विकास निधीची अपेक्षा गावकरी करीत आहे. शिरपूरवरून जवळच कवडशी येथे घनदाट वनराई आहे. या वनात चंदनाची झाडे आढळून येतात. उंच टेकडीवर प्राचीन दत्ताचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी तलाव असून हा तलाव कधीही कोरडा पडलेला नाही. तलावाच्या दक्षिणेस जंगलामध्ये ऐतिहासिक गुहा आहेत. येथे दत्त जयंतीला दरवर्षी यात्रा भरते.वन विभागाने या स्थळाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शासनाने येथील ऐतीहासीक मंदिर व गुहाची दुरूस्ती करून उजेडात आणले, तर हे एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. अशाच प्रकारच्या ऐतीहासीक गुहा केसुर्ली येथील जंगलातदेखिल आहेत. मात्र त्या अजूनही दुर्लक्षीत आहे. पुरातत्व विभागाने या गुहांचा विकास केल्यास या स्थळालाही महत्त्व प्राप्त होऊ शकते. या परिसरातही ३०० एकराची असलेली वनराई नैसर्र्गिक सौंदर्य वाढवत आहे.