शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कोल्हे ले-आऊटमध्ये इसमाचा खून

By admin | Updated: March 1, 2017 01:21 IST

स्थानिक दारव्हा मार्गावर असलेल्या कोल्हे ले-आऊट भाग २ मध्ये इसमाच्या खुनाची घटना चार दिवसानंतर उघडकीस आली.

कुजलेला मृतदेह : चार दिवसांपूर्वीची घटना यवतमाळ : स्थानिक दारव्हा मार्गावर असलेल्या कोल्हे ले-आऊट भाग २ मध्ये इसमाच्या खुनाची घटना चार दिवसानंतर उघडकीस आली. परिसरात दुर्गंधी पसरल्याने संशयावरून पोलिसांना सोमवारी रात्री बोलविण्यात आले. तेव्हा ही घटना उघड झाली. मोहन गणूजी वाघमारे (५४) असे या इसमाचे नाव आहे. मोहन वाघमारे हे मागील दोन महिन्यांपासून घरात एकटेच राहत होते. त्यांची मुलगी हैदराबाद येथे तर मुलगा चंद्रपूरला शिक्षणासाठी आहे. पत्नी मुद्रिका ही दोन महिन्यांपासून माहेरी बोरीसिंह येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. मोहन वाघमारे हे घरात एकटेच होते. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची बाब मनूबाई पठाडे यांनी वाघमारे यांचे भाऊ गणेश शिवराम वाघमारे यांना सांगितली. त्यानंतर घराचे दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय बळावल्यानंतर वडगाव रोड पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रात्री १०.३० च्या सुमारास घराचे दार तोडले असता मोहन वाघमारे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. कुणी तरी अज्ञात मारेकऱ्यांनी मोहन वाघमारे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. तो हत्या केल्यानंतर जिन्याने छतावरून उडी मारुन बाहेर पळाल्याचे स्पष्ट होते. जिन्यावर रक्ताने माखलेल्या बुटाचे ठसे उमटले आहे. शिवाय छतावरही रक्ताचे डाग आहेत. मारेकरी एक किंवा दोन असावे, असा संशय आहे. मारेकरी हा परिचित असावा, त्याने दार ठोठावूनच घरात प्रवेश केला आणि नंतर त्यांच्यात झटापट झाली असावी असा अंदाज परिस्थितीजन्य स्थितीवरून लावल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)