६८.६२ टक्के : मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, केळापूर, घाटंजी तालुक्यातही अधिक यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या गट व गणांसाठी गुरूवारी आदिवासीबहुल मारेगाव, झरी, केळापूर, राळेगाव, कळंब आणि घाटंजी तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. गुरूवारी पार पडलेल्या मतदानात मारेगाव तालुक्यातील सर्वाधिक ७५.६७ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यातील १० हजार ३९९ पुरूष आणि आठ हजार ७९३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. झरी तालुक्यातील २२ हजार ७४८ पुरूष, तर २० हजार २०८ महिलांनी हक्क बजावला. तिसऱ्या क्रमांकावर केळापूर तालुक्यात ३५ हजार ४३२ पुरूष, तर ३२ हजार ३६७ महिलांनी हक्क बजावला. चौथ्या क्रमांकावरील राळेगाव तालुक्यात २८ हजार ३२५ पुरूष, तर २४ हजार ६०३ महिलांनी मतदान केले. घाटंजी तालुक्यात ३३ हजार १६४ पुरूष आणि २९ हजार २१३ महिलांनी हक्क बजावला. कळंब तालुक्यात २८ हजार ३२५ पुरूष, तर २४ हजार ६०३ महिलांनी हक्क बजावला. दिग्रस तालुक्यात २८ हजार ३६३ पुरूष आणि २४ हजार ४४० महिलांनी मतदान केले. दारव्हा तालुक्यातील ३४ हजार २२६ पुरूष, तर २९ हजार ७७४ महिलांनी मतदान केले. आर्णी तालुक्यात २५ हजार ९९९ पुरूष आणि २२ हजार ६५३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. वणी तालुक्यातील ३२ हजार ४२८ पुरूष व २६ हजार ४३२ महिलांनी मतदान केले. यवतमाळ तालुक्यात ३६ हजार ७२७ पुरूष, तर ३२ हजार ३८३ महिलांनी हक्क बजावला. नेर तालुक्यातील १६ हजार ७३९ पुरूष व १४ हजार ९०४ महिलांनी मतदान केले. उमरखेड तालुक्यात ४५ हजार ५८५ पुरूष, तर ४० हजार ३९६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. महागाव तालुक्यात ४४ हजार ६२५ पुरूष व ३८ हजार ६८५ महिलांनी मतदान केले. बाभूळगाव तालुक्यात २३ हजार ७३ पुरूष व २० हजार ४९९ महिलांनी हक्क बजावला. पुसद तालुक्यात ६० हजार १६० पुरूष आणि ५२ हजार ६९१ महिलांनी मतदान केले. सर्वाधिक मतदानाचे तालुके एसटीसाठी आरक्षित राळेगाव व केळापूर विधानसभा क्षेत्रातील आहेत, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)
आदिवासीबहुल तालुक्यांत सर्वाधिक मतदान
By admin | Updated: February 18, 2017 00:11 IST