शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅर्टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:34 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल्पींग हॅन्ड’ म्हणून उपस्थित राहणार आहे.

ठळक मुद्देपहिलाच प्रयोग : पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्याक्षिकावर भर

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल्पींग हॅन्ड’ म्हणून उपस्थित राहणार आहे.‘मेडिकल’च्या अपघात कक्षात सतत धावपळ असते. डॉक्टरांना कक्षसेवकही कमी पडतात. अशा स्थितीत अपघातातील जखमी मोठ्या प्रमाणात आल्यास तारांबळ उडते. विषबाधेसह नानाविविध प्रकारचे रुग्ण येथे येतात. त्यामुळे आता पहिल्या वर्षापासूनच उपचार प्रत्यक्ष कसे केले जाते, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. शिवाय या विद्यार्थ्यांची मदतही अपघात कक्ष वैद्यकीय अधिकाऱ्याला होणार आहे.अपघात कक्षात एकावेळी १७ विद्यार्थ्यांची चमू ठेवण्यात येत आहे. अगदी पेशंटला स्ट्रेचरवर टाकून आणणे, त्याला विविध चाचण्यांसाठी घेऊन जाणे, अशी साधी कामे विद्यार्थी करणार आहे. त्यांना अपघात कक्षात काही तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. यात इसीजी कसा काढायचा, बीपी आॅपरेटर हाताळणे, आयव्ही लावणे, सेक्शन मशीनचा वापर, व्हेंटीलेटर लावणे याबाबत त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उपचार कसा होतो, हे विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.हा पॅर्टन अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला. सुरूवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. विद्यार्थ्यांना सक्ती करावी लागत होती. मात्र आता याचा लाभ लक्षात आल्याने विद्यार्थी स्वत:च आलेल्या रुग्णांची सुश्रृषा करीत असल्याचे अधिष्ठाता डॉ.श्रीगिरीवार यांनी सांगितले. हा पॅटर्न सहज राबविता येण्याजोगा आहे.पोर्टेबल बायोमेट्रिकवर अटेंडन्सवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अटेंडन्साठी बायोमेट्रिक मशीन लावण्यात आले होते. मात्र यात जाणीपूर्वक बिघाड करून दांडी मारली जात होती. हा प्रकार थांबविण्यासाठी आता थेट पोर्टेबल बायोमेट्रीक मशीन वापरले जाणार आहे. प्रत्येक वर्गात प्रशासनातील कर्मचारी जाऊन विद्यार्थी व प्राध्यपकांची उपस्थिती घेणार आहे. यामुळे आता दांडी बहाद्दरांना चाप बसणार आहे.