शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस

By admin | Updated: June 22, 2017 01:11 IST

तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

शेती करणे झाले कठीण : वन अधिकारी म्हणतात, ‘शेताचे स्वत:च रक्षण करा’ लोकमत न्यूज नेटवर्क $$्रिपांढरकवडा :

 तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मृगाच्या पूर्वाधातच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. सोयाबीन व कपाशिच्या बियाण्याला अंकुर फुटले. काळी जमीन हिरवीगार झाली. आपली पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. परंतु वाऱ्हा, कवठा, अर्ली, चनाखा, बोथ, बहात्तर या भागात रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून पिके उध्वस्त करीत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे नुकसान होते. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जंगल परिसराला लागून असेल्या या गावातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. वन विभागांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता, ते स्वत:च्या शेतातील पिकांचे स्वत:च संरक्षण करण्याचे सांगतात. परंतु पिकांचे संरक्षण करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वन्यप्राणी शेतात घुसून शेतीचे नुकसान करीत असे, व शेतकरी त्या वन्यप्राण्यांना पिटाळून लावत असे, त्यात या प्राण्यांना कमी-जास्त झाल्यास वन विभागाचे कर्मचारी उलट शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करतात. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहे. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सोयाबीन, तुरीचे पीक उद्ध्वस्त कवठा येथील देवकाबाई नामदेव घडसनवार यांच्या शेतात पाच एकर जमिनीत पेरलेल्या सोयाबीन व तुरीच्या पिकाचे रानडुकराच्या कळपाने शेतात हैदोस घालून संपूर्ण पीक उद््ध्वस्त केले. कवठा शिवारात असलेल्या देवकाबाईच्या १.९२ हेक्टर शेतात त्यांनी सोयाबीन व तूर या पिकाची पेरणी केली. यामध्ये पाच बॅग सोयाबीन व १० किलो तुरीचे बियाणे पेरले. तसेच १० बॅग रासायनिक खतही दिले. त्यांनी बियाणे व खतावर १५ हजार ७०० रूपयांचा खर्च केला. परंतु रानडुकराचे कळप या शेतात घुसले आणि त्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जर हे पीक उद्ध्वस्त केले नसते, तर दीड लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झाले असते. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवकाबार्इंनी तहसीलदार, वनाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.