शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यात अतिवृष्टी

By admin | Updated: July 13, 2016 03:06 IST

गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

निळोणा ओव्हरफ्लो : जुगाद, दिग्रस, दुर्भला पुराचा वेढा, पाटणबोरी रस्ता बंद यवतमाळ : गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पैनगंगा आणि खुनी नदीच्या संगम परिसरातील झरी तालुक्यात सर्वाधिक तडाखा बसला आहे. जुगाद, दिग्रस, दुर्भला पुराचा वेढा पडला असून, एनडीआरएफचे जवान बचावासाठी रवाना झाले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, निम्न वर्धा आणि अधर पूस प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने नदीतीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात सहा तालुक्यात ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यात आर्णी १११ मिमी, दारव्हा ६६, दिग्रस ९१, पुसद ९९, महागाव ८९ आणि झरीत ९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात मान्सूनची सक्रियता वाढल्याने दक्षिणेकडील पावसाचे ढग विदर्भाकडे सरकले. त्यामुळे सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मासिक सरासरीच्या १३८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून, हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४८ टक्के आहे. उमरखेड तालुक्यातही पैनगंगेचा तडाखा बसला. पळशी गावातील आठ शेळ्या पुरात वाहून गेल्या. दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीचे पात्रही फुगले असून सततच्या पावसाने तालुक्यातील ५० घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतीरावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर) पैनगंगा आणि खुनी नदीमुळे हाहाकार या पावसाचा सर्वाधिक तडाखा झरी तालुक्याला बसला. मंगळवारी दुपारपर्यंत जुगाद गावाला पैनगंगेचा वेढा पडला होता. दिग्रस आणि दुर्भ ही दोन गावे पाण्याखाली आली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे. सायंकाळी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना यांनी एनडीआरएफच्या चमूला पाचारण केले. दोन बोटींसह आपत्ती निवारणचे पथक रवाना झाले आहे. खुनी आणि पैनगंगा नदीचा प्रवाह धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. खुनी नदीला आलेल्या पुरामुळे पाटणबोरी मार्ग अनेक तास बंद होता.