शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

८४७ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:50 IST

पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.

ठळक मुद्देजलस्त्रोत दूषित : पावसाळी आजार रोखण्यासाठी दक्षतेचे पाऊल, उपाययोजना न केल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे एकूण १२ हजार जलस्त्रोत आहे. या जलस्त्रोतांवरून गावांना पाण्याच्या पुरवठा होतो. मात्र यापैकी बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. यामध्ये झरी आणि पुसद तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांचा समावेश आहे. ८४५ ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.पाहणी अहवालातून पुढे आलेले लाल आणि पिवळे कार्ड म्हणजे ते पाणी मानवी आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे आता पावसाळ्या पूर्वीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने ८४७ ग्रामपंचायतींना नोटीस बजावली आहे. जे स्त्रोत उकिरडे, शौचालय आणि गटारामुळे दूषित झाले, अशा ठिकाणी स्वच्छता करून पेयजलाचे स्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली.या नोटीसमधील सूचनांचे पालन न झाल्यास थेट सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे ग्रामपंचायतींना गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायतींचे जलस्त्रोत धोकादायक अवस्थेत आहे. जलस्त्रोत शुद्ध ठेवण्यात हयगय झाल्यास साथरोग पसरल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- डॉ.किशोर कोषटवारसाथरोग नियंत्रण अधिकारी, यवतमाळ